बॉलिवूड फिल्म इडंस्ट्रीमध्ये अनेक असा सेलिब्रिटी आहेत ज्या आपल्या अॅक्टिंगसोबतच फिटनेसमुळेही चर्चेत असतात. या यादीमध्ये अलिया भट्टचाही समावेश होतो. आज आलिया भट्टचा 26वा वाढदिवस आहे. स्टुडन्ट्स ऑफ दि इयर चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या आलियाने आपल्या क्यूट अभिनयाने अनेकांच्या मनाचा ठाव घेतला. पण तुम्हाला माहीत आहे का? आज बोल्ड आणि क्यूट दिसणारी आलिया एके काळी 67 किलोची गोलमटोल होती. पण आताचा आलियाचा ग्लमर्स अंदाज पाहून कोणाला विश्वासच बसणार नाही की, ती खरचं इतकी जाडी होती. सध्या बॉलिवूडच्या टॉप अदाकांरामध्ये आपलं सौंदर्य आणि क्यूटनेसच्या जोरावर टिकून आहे. आज आम्ह तुम्हाला आलियाचा फिटनेस फंडा सांगणार आहोत. जाणून घेऊया टोन्ड बॉडीसाठी आलिया काय डाएट प्लॅन फॉलो करते....

आलिया एक अशी अभिनेत्री आहे, जिने एकापेक्षा एक हिट चित्रपट देऊन बॉलिवूडमध्ये आपली जागा तयार केली आहे. आपल्या डाएटबाबत सांगताना आलियाने सांगितले की, ती दर दोन तासांनी काहीना काही आपल्या डाएटमध्ये सहभागी करते.

संपूर्ण दिवसात ती एकूण 5 मील घेते. त्यामध्ये नट्सपासून अनेक हेल्दी पदार्थांचा समावेश होतो. ज्यामुळे संपूर्ण शरीराला पोषक तत्व मिळण्यास मदत होते. 

नाश्ता : 

सकाळचा नाश्ता आरोग्य उत्तम राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो, असे आपण नेहमीच ऐकतो. त्यामुळे आलिया नाश्त्यामध्ये ब्रेड टोस्ट, कॉर्नफ्लॅक्स, पोहे, अंड्याचं सॅन्डविच, साखर नसलेला चहा किंवा कॉफी यांचा समावेश करते. 

जवळपास दुपारी 12च्या आसपास ती भाज्या आणि फळांपासून तयार करण्यात आलेला ज्यूस पिते किंवा इडली सांबर खाते. 

दुपारचं जेवण अत्यंत साधारणच असतं. यामध्ये डाळ, चपाती, भाज्या यांचा समावेश असतो. डाळ आणि भाज्यांमध्ये तेलाचा वापर केलेला नसतो. तसेच मसालेही फार कमी असतात. 

संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये आलिया फळं, चहा किंवा कॉफी यांचा समावेश करते. यामध्येही ती साखरेचा वपर करत नाही. 

रात्रीच्या जेवणामध्ये चपाती, तांदूळ, भाज्या, एक कटोरी डाळ आणि एक पीस चिकन ब्रेस्टचा समावेश करते. 

आलियाला कमी कार्ब्स आणि हाय प्रोटीन डाएट घेण्याची सवय आहे. तिला सर्वात जास्त फायबर रिच फूड आवडतात. त्यामध्ये ओट्स, दही आणि दही यांसारख्या पदार्थांचा समावेश असतो. 

आलियाचा फिटनेस फंडा

आलिया सांगते की, ती सर्व पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करते पण कमी प्रमाणात. जास्तीत जास्त पाणी पिते. तेल नसलेले पदार्थच खाणं पसंत करते. फायबर असणारे पदार्थ जास्त खाते. पण यासर्वांमध्ये ती अगदी कटाक्षाने साखरेपासून दूर राहते. रात्री झोपण्यापूर्वी दोन तास अगोदर ती आपलं जेवण करते. आलियाचं असं म्हणणं आहे की, एक्स्ट्रा कॅलरी शरीरातून काढून टाकायच्या असतील तर कार्डियो एक्सरसाइज बेस्ट ऑप्शन्स आहेत. पांढरे तांदूळ आणि कोणत्याही प्रकारचं सॉफ्ट ड्रिंक घेण्यापासून रोखणं आवश्यक असतं. हिरव्या भाज्या आणि फळांचं डाएट यांचा आहारामध्ये अवश्य समावेश करावा. तसच वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, एक्सरसाइज. याशिवाय वजन कमी करणं अत्यंत अवघड काम आहे. आलियाच्या एक्सरसाइजमध्ये स्विमिंग, रनिंग, डंबल, पुशअप, वॉक, पिलाटेस आणि योग यांचा समावेश असतो. 


Web Title: Alia bhatts 26th birthday know all about alia bhatt diet plan and fitness mantra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.