Alert: Be very careful in the exercise, be careful, father! | Alert : ​अति प्रमाणात व्यायाम करणाऱ्यांनो व्हा सावधान, बनू शकणार नाही वडील !

-रवीन्द्र मोरे 
सेलिब्रिटी ज्या पद्धतीने जिममध्ये मेहनत घेतात, त्याला शास्त्रीय आधार असतो, त्यांचे वेळेचे नियोजन ठरलेले असते. विशेष म्हणजे प्रत्येक सेलिब्रिटी तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानुसारच जिममध्ये वर्कआउट करतात, शिवाय त्यांचा डायट प्लॅनही ठरलेला असतो. म्हणून त्यांना अपेक्षित रिझल्ट मिळतो. त्यांचेच अनुकरण करून आपलीही बॉडी सेलिब्रिटींसारखी असावी, त्यांच्या सारखे आपलेही मसल्स, सिक्स अ‍ॅब्स असावेत, असे सध्याच्या तरुणाईला वाटते. त्यासाठी बहुतांश तरुण रात्रंदिवस जिममध्ये जाऊन मेहनत करतात. बरेच तरुण तर लवकरात लवकर पिळदार शरीर बनण्याच्या प्रयत्नात अति प्रमाणात मेहनत घेतात. त्यांना  मात्र अति प्रमाणात केलेली ही मेहनत पुरुषांना महागात पडू शकते, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. सोबतच स्टेरॉइडचाही प्रयोग करीत असतील तर वांझपणा (इनफर्टाइल) देखील येऊ शकतो, असे आयव्हीएफ हॉस्पिटलचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते, जास्त वेळ कठिण मेहनत केल्याने पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होते, ज्याचा परिणाम महिलांच्या गर्भावस्थेवर होतो त्यामुळे मुले जन्माला येऊ शकत नाही.
 
वांझपणा वाढविण्यासाठीच्या अन्य घटकांपैकी एक घटक म्हणजे बॉडी बिल्डिंगसाठी वापरण्यात येणारे स्टेरॉइड होय, ज्यामुळे ‘जूस्पर्मिया’ नावाचा आजार होतो. जूस्पर्मिया झाल्यानंतर शुक्राणूंची निर्मिती होणे थांबते. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार सुमारे एक टक्के भारतीय पुरुष ‘जूस्पर्मिया’ या आजाराने प्रभावित आहेत.  
 
इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलचे तज्ज्ञ अरविंद वेद यांनी सांगितले की, असे बरेच लोक आहेत जे बॉडी बिल्डिंगसाठी अति प्रमाणात मेहनत घेतात, ज्यामुळे त्यांच्या शरीरात शुक्राणूंची संख्या कमी होत असते.जर कोणी मेहनत करुन जास्त थक त असेल, तर त्या पुरुषाच्या तुलनेत सामान्य मेहनत करणाºयामध्ये शुक्राणूंची संख्या जास्त असते.  

आयव्हीएफ विशेषज्ञ रेखा गोस्वामी यांच्या मते, अति प्रमाणात मेहनत घेण्याऱ्यांमध्ये वांझपणाची समस्या जास्त काळ टिकून राहते, मात्र विना डॉक्टरांच्या सल्लयाशिवाय जे स्टेरॉइडचे सेवन करतात, त्यांच्यासाठी जास्त धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले.

Also Read : ​Fitness : ​बॉडी बिल्डिंगचे हे आहेत ‘५’ मोठे गैरसमज, सर्वांना वाटतात सत्य !
Web Title: Alert: Be very careful in the exercise, be careful, father!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.