आंब्याच्या पानांपासून विद्यार्थ्यांनी तयार केलं मद्य, डायबिटीस आणि फॅटपासून होईल बचाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 12:33 PM2019-06-11T12:33:03+5:302019-06-11T12:33:09+5:30

आंब्यांच्या पानांपासून हे मद्य तयार करण्यासाठी ४० ते ४५ दिवसांचा कालावधी लागला. हे मद्य ग्लूकोज, कार्बोहायड्रेट आणि पेप्टॉन प्रोटीनच्या किण्वनपासून तयार करण्यात आली आहे.

Alcohol mixed with mango leaves will decrease diabetes and fat | आंब्याच्या पानांपासून विद्यार्थ्यांनी तयार केलं मद्य, डायबिटीस आणि फॅटपासून होईल बचाव!

आंब्याच्या पानांपासून विद्यार्थ्यांनी तयार केलं मद्य, डायबिटीस आणि फॅटपासून होईल बचाव!

Next

जीवाजी युनिव्हर्सिटीमध्ये हेल्थ सेंटरच्या विद्यार्थ्यांनी आंब्याच्या पानांपासून मद्य तयार केलं आहे. या मद्यात ८ ते १२ टक्के अल्कोहोलचं प्रमाण असेल. तरी सुद्धा या मद्याने डायबिटीज हा आजार रोखण्यासोबतच फॅट कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत होईल असा दावा करण्यात आला आहे.

भास्कर डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, हे मद्य तयार करण्यासाठी ४० ते ४५ दिवसांचा कालावधी लागला. हे मद्य ग्लूकोज, कार्बोहायड्रेट आणि पेप्टॉन प्रोटीनच्या किण्वनपासून तयार करण्यात आली आहे. आता हे मद्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखाद्या कंपनीसोबत आपला फॉर्म्यूल्याचा एमओयू साइन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

आजार रोखण्यासाठी फायदेशीर

आंब्याच्या पानांपासून मद्य तयार करण्याचा फॉर्म्यूला जेयूच्या हेल्थे सेंटरचे प्रभारी प्रा. बीबीकेएस प्रसाद आणि विद्यार्थीनी रूपाली दत्त यांच्या सहकाऱ्यांनी तयार केली आहे. यात आंब्याच्या पानांमध्ये आढळणाऱ्या मॅंगो फेरीन तत्त्वांची महत्त्वाची भूमिका आहे. याने वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यास मदत होणार असे सांगितले जात आहे. खास बाब ही आहे की, आंब्याची पाने वर्षभर उपलब्ध असतात, ज्यामुळे हे मद्य कोणत्याही सीझनमध्ये तयार केलं जाऊ शकतं.

काय आहेत फायदे?

1) आंब्याच्या पानांमध्ये मॅंगो फेरीन असतं. याने डायबिटीससारखा आजार रोखला जाऊ शकतो. तसेच शरीरातील फॅट कमी होतं आणि यात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुणही असतात. 

२) गॅलिक अ‍ॅसिड, पॅरासिटीन, कॅटाइचिन, इपि कॅटाइचिन शरीरातील पेशींना कमजोर होऊ देत नाही.

३) एस्कॉर्बिक अ‍ॅसिडने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसेच यात कॅल्शिअम असतं, ज्यामुळे हाडेही मजबूत होतात. 

Web Title: Alcohol mixed with mango leaves will decrease diabetes and fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.