Aesthetic Treasures 'Mango'! | सौंदर्याचा खजिना ‘आंबा’!

आंबट गोड स्वाद देणारा फळांचा राजा आंबा आपणा सर्वांनाच आवडतो. आंब्याचे तसे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र हा आंबा आरोग्यासाठीच फायदेशीर नव्हे तर तो सौंदयार्साठीही खूप उपयुक्त आहे. जाणून घ्या,आंब्याचे सौंदर्यविषयक उपयोग.

* पिंपल्सवर उपयुक्त 
ब-याच जणांच्या चेह-यावर पिंपल्स असतात, याने सौंदर्यात बाधा येते.आपणही पिंपल्सने त्रस्त असाल तर कच्च्या कैरीला बारीक कापून त्याला पाण्यात उकळून घ्या. या पाण्याने दिवसातून दोनवेळा चेहरा धुतल्याने पिंपल्स कमी होण्यास मदत मिळेल.
 
* ब्लॅकहेड्स होतात नाहिसे
बरेचजण ब्लॅकहेड्सनेही त्रस्त असतात. ते नाहिसे करण्यासाठी एका वाटीत आंब्याचा गर घ्या. यामध्ये एक चमचा मिल्क पावडर आणि एक चमचा मध मिसळून पॅक तयार करा. हा पॅक चेहºयाला लाऊन काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे डेड स्कीन आणि ब्लॅकहेड्स नाहीसे होऊन त्वचेला नॅचरल ग्लो येईल.
 
* डार्क स्पॉट होतात दूर
 चेह-यावरील डार्क स्पॉट घालविण्यासाठी आंब्याच्या सालींचा फेसपॅक उपयुक्त ठरतो. त्यासाठी आंब्यांच्या सालींना उन्हात वाळवून त्याची पावडर तयार करून घ्या. या पावडरमध्ये दही किंवा गुलाब पाणी मिसळून रोज लावा. हा पॅक डार्क स्पॉट आणि पिग्मेंटेशन दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.

* मुलायम त्वचेसाठी 
कैरी उकडून त्याचा गर चेहरा, गळा मान यावर चोळून घ्यावा व मग वाळल्यावर धुवावे. त्वचा मुलायम व कांतिमान बनेल. 

Web Title: Aesthetic Treasures 'Mango'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.