५ मिनिटांच्या 'या' वर्कआउटने एक आठवड्यात कमी करा पोटावरील चरबी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 10:50 AM2019-04-17T10:50:21+5:302019-04-17T10:55:58+5:30

अलिकडे लोक एक्सरसाइज केवळ वजन कमी करण्याचं माध्यम म्हणूण बघू लागले आहेत.

This 5 min workout will decrease belly fat in 1 week | ५ मिनिटांच्या 'या' वर्कआउटने एक आठवड्यात कमी करा पोटावरील चरबी!

५ मिनिटांच्या 'या' वर्कआउटने एक आठवड्यात कमी करा पोटावरील चरबी!

googlenewsNext

अलिकडे लोक एक्सरसाइज केवळ वजन कमी करण्याचं माध्यम म्हणूण बघू लागले आहेत. पण एक्सरसाइज केवळ वजन कमी करण्यासाठी नाही तर नेहमी फिट आणि हेल्दी राहण्यासाठीही गरजेची असते. कारण जर तुमचं वजन अधिक असेल आणि पोटावर चरबी जमा झाली असेल तर हे दिसायलाही वाईट दिसतं आणि तुम्हाला डायबिटीज व हृदयरोगांचीही समस्या होऊ शकते. त्यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक असं वर्कआउट सांगणार आहोत जे तुम्ही केवळ ५ मिनिटे केल्यास एका आठवड्यात बाहेर आलेलं पोट कमी करु शकाल. 

बायसिकल क्रंच करुन बघा

नेहमीच डायटिंग आणि एक्सरसाइजनंतर पोटावरील चरबी कमी होत नाही. कारण पोटावरील चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला अशी एक्सरसाइज करावी लागेल ज्याने शरीराच्या कोरवर फोकस केला जाईल. बायसिकल क्रंच एक अशी एक्सरसाइज आहे ज्याद्वारे केवळ पोटावरील चरबीच कमी होईल असे नाही तर शरीराला एक चांगला पोश्चरही मिळेल. 

पोटाच्या मांसपेशींसाठी चांगली एक्सरसाइज

बायसिकल क्रंच एक फार उत्तम एक्सरसाइज आहे. याने केवळ पोटाच्या अ‍ॅब्सनाच नाही तर पोटाच्या दोन्ही बाजूने असलेल्या मांसपेशींचा वर्कआउटही चांगला होतो. या एक्सरसाइजच्या माध्यमातून अ‍ॅब्डॉमिनिल मांसपेशी म्हणजेच पोटाच्या मांसपेशीचा चांगला वर्कआउट होतो आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळते. 

कशी कराल एक्सरसाइज?

- पायांना गुडघ्यापासून मोल्ड करुन जमिनीवर पाठिवर झोपा.

- दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवा. 

- पोट आत करा आणि खांदे जमिनीवरुन वर उचला आणि गुडघे छातीच्या जवळ आणा.

- ही एक्सरसाइज पुन्हा पुन्हा करा. 

- लवकर पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी ३ वेळी ही एक्सरसाइज करा. १० ते १२ वेळा ही एक्सरसाइज रिपीट करा.

मानेची आणि पाठिची समस्या असेल तर टाळा

ही एक्सरसाइज करताना तुम्हाला याची काळजी घ्यायची आहे की, तुम्हाला अ‍ॅब्सना टाइट करायचं आहे मानेला नाही. पण जर तुम्हाला जर आधीच मानेची किंवा पाठिची कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर ही एक्सरसाइज करु नका. सोबतच ही एक्सरसाइज सुरु करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांनी किंवा फिजिकल थेरपिस्टना एकदा संपर्क नक्की करा. 

(टिप - वरील सल्ले केवळ माहिती म्हणूण वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. या एक्सरसाइजने पोटावरील चरबी कमी होईलच असा दावा आम्ही करत नाही. कारण प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते. ही एक्सरसाइज करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

Web Title: This 5 min workout will decrease belly fat in 1 week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.