फॅटी लिव्हरची समस्या आजकाल लोकांमध्ये फार दिसून येते. लिव्हरमध्ये जेव्हा फॅट्सची मात्रा वाढते त्यावेळी लिव्हरच्या कार्यावर प्रभाव दिसून येतो. ज्यावेळी लिव्हरच्या कामामध्ये अडथळा येतो आणि लिव्हरचा आकार वाढू लागतो. त्यावेळी शरीरातील रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेतही अडथळे येतात. त्यामुळे लिव्हरसंबंधीचे अनेक आजार होण्याचा धोका संभवतो. त्याचप्रमाणे फॅटी लिव्हरमुळे शरीराच्या पचनसंस्थेवरही परिणाम दिसून येतो. 

फॅटी लिव्हरपासून असा करा बचाव :

फॅटी लिव्हरच्या समस्येपासून वाचण्यासाठी दररोजच्या डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.  काही खाद्यपदार्थांचा आहारामध्ये समावेश करून फॅटी लिव्हरच्या समस्येपासून बचाव करणं शक्य होतं. जाणून घेऊया काही घरगुती उपचार ज्यांचा वापर करून तुम्ही फॅटी लिव्हरच्या समस्येच्या त्रासातून सुटका करून घेऊ शकता. 

ग्रीन टी

ग्रीन टीचं सेवन करणं लिव्हरसाठी फायदेशीर ठरतं. ग्रीन टी प्यायल्याने लिव्हरमधील फॅट्स कमी होण्यासोबतच त्यातील फॅट्स रोखण्यासही मदत होते. दिवसातून दोन कप ग्रीन टी प्यायल्याने लिव्हरचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. 

अॅपल व्हिनेगर 

अॅपल व्हिनेगर आरोग्यासाठी लाभदायक ठकतं. याचं सेवन केल्याने लिव्हरचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते आणि फॅट्सही कमी होतात. अॅपलचं सेवन करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा अॅपल व्हिनेगर टाकून दररोज सेवन करावं. 

लिंबू 

लिंबू लिव्हर हेल्दी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. जर तुम्ही अल्कोहोलचे सेवन करत असाल तर लिंबाचं सेवन अवश्य करा. दररोज सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करून सेवन केल्याने लिव्हरचं आरोग्य राखण्यास मदत होते. 

कारलं

कारलं शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचं काम करतं. कारल्याच्या सेवनाने शरीराची पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. त्याचसोबत शरीरातील साखरेचं प्रमाणही नियमित करण्यास मदत होते. आठवड्यातून कमीतकमी 2 वेळा कारल्याचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. 

जवस

लिव्हरच्या कोणत्याही समस्येवर जवस अत्यंत लाभदायक ठरते. आयुर्वेदातही जवसचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. दररोज एक चमचा जवस पाण्यासोबत घेतल्याने लिव्हरच्या समस्या दूर होतात. 


Web Title: 5 ayurveda tips for fatty liver
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.