सर्वांगीण विकासासाठी समन्वयातून कामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:50 AM2018-12-15T00:50:10+5:302018-12-15T00:51:42+5:30

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यात सुरु असलेली कामे सर्व विभागांनी समन्वयातून करु न प्रलबिंत कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी केल्या.

Work in coordination for overall development | सर्वांगीण विकासासाठी समन्वयातून कामे करा

सर्वांगीण विकासासाठी समन्वयातून कामे करा

Next
ठळक मुद्देसंजीव कुमार : प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यात सुरु असलेली कामे सर्व विभागांनी समन्वयातून करु न प्रलबिंत कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी केल्या.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात गुरूवारी जिल्ह्यातील विकासात्मक कामाचा आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक हरिश बैजल, उपवनसंरक्षक एस.युवराज, उपायुक्त सुधाकर तेलंग, के.एन.के.राव, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे व निवासी उपजिल्हाधिकारी हरिश धार्मिक उपस्थित होते.
संजीव कुमार म्हणाले, अपूर्ण असलेले घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी तातडीने बैठक घेवून नियोजन करावे. इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजनेबाबत विशेष मोहीम राबवून घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे. तसेच अस्मिता योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्र म, पाणीटंचाई निवारण कृती आराखडा, ११ हजार सिंचन विहीर कार्यक्र म, जलयुक्त शिवार अभियान, सर्व शिक्षा अभियान व आरोग्य विषयक कामांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच अपूर्ण कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवन कार्यक्र माचा आढावा, १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्र म जिवंत रोपांची टक्केवारी तसेच ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्र म, अपूर्ण सिंचन विहिरी पूर्ण करणे व प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आदी विषयाचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
वनहक्क दावे मार्गी लावण्यासाठी मोहीम
धान पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे झालेल्या नुकसानीचा निधी प्राप्त झाला असून त्याचे वाटप डिसेंबर महिन्यापर्यंत करावे. तसेच सामुहिक वनहक्क दावे व वैयक्तिक वन हक्क दावे निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी. महसूल वसुलीला गती देण्याची सूचना संजीव कुमार यांनी केली.

Web Title: Work in coordination for overall development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.