जलयुक्त शिवार योजना आराखडा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 09:53 PM2018-10-07T21:53:08+5:302018-10-07T21:53:47+5:30

जलयुक्त शिवार योजना २०१८-१९ साठी निवड झालेल्या तालुक्यातील गावात करावयाच्या जलसंधारण कामांचे नियोजन करण्यासंबंधाने तालुकास्तरीय जलयुक्त शिवार योजना समितीची बैठक नुकतीच पंचायत समिती बचत भवनात घेण्यात आली.

Water Plant Scheme Plan | जलयुक्त शिवार योजना आराखडा बैठक

जलयुक्त शिवार योजना आराखडा बैठक

googlenewsNext
ठळक मुद्देकामांचा आराखडा तयार केला : १६ गावांसाठी २७७ कामे प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जलयुक्त शिवार योजना २०१८-१९ साठी निवड झालेल्या तालुक्यातील गावात करावयाच्या जलसंधारण कामांचे नियोजन करण्यासंबंधाने तालुकास्तरीय जलयुक्त शिवार योजना समितीची बैठक नुकतीच पंचायत समिती बचत भवनात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सभापती अरविंद शिवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती करुणा नांदगावे, पंचायत समिती सदस्य रामलाल मुंगणकर, तालुका जलयुक्त शिवार समिती सचिव तथा तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, सहायक खंड विकास अधिकारी मयुर आंदेलवाड, लपाजिपचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी सुभाष घरतकर, वनपरिक्षेत्राधिकारी छगन रहांगडाले उपस्थित होते.
जलयुक्त शिवार योजनेत यावर्षी अरततोंडी, इंजोरी, निलज, धाबेटेकडी (आदर्श), चापटी, तिडका (करड), देऊळगाव (बोदरा), पांढरवानी (रैय्यत), सिरेगावबांध, भुरसीटोला, संजयनगर, सुकळी, सोमलपूर, चान्ना, चुटिया, कोहलगाव या १६ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
सदर गावामध्ये शासनाच्या विविध यंत्रणामार्फत जलसं:धारणाची कामे मोठ्या प्रमाणात करुन गावातील तळे, बोड्या, बंधाऱ्यामधील पाण्याची सिंचन क्षमता वाढविण्यात प्रयत्न केला जाणार आहे. निवड झालेल्या गावांमध्ये कोणती कामे करायची, आराखडा बनवून प्रस्तावित कामे करण्यासाठी स्थानिक गावचे सरपंच, पदाधिकारी यांना या बैठकीत खास निमंत्रित करण्यात आले होते. तसेच ग्रामसेवक, विविध शासकीय यंत्रणाचे अधिकारी, कर्मचारी, मग्रारोहयो पं.स.चे सहायक कार्यक्रम अधिकारी, अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध, गोठणगावचे वनपरिक्षेत्राधिकारी, लपाजिपचे शाखा व कनिष्ठ अभियंता, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, जलसंधारण विभाग देवरीचे कनिष्ठ अभियंता खोकले तसेच पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. सभेत निवड झालेल्या गावातील पदाधिकाºयांनी विविध कामे सुचविली. बैठकीत सर्वांच्या समन्वयातून गावाच्या परिस्थितीनुरुप कामाचा आराखडा तयार करण्यात आला. १६ गावांसाठी २७७ कामे प्रस्तावित करण्यात आली. याप्रसंगी शिवणकर यांनी, जलयुक्त शिवार योजना गावातील शेतकºयांसाठी एक वरदान आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे एका पाण्यासाठी धान पिकाच्या उत्पादनापासून वंचित रहावे लागले. जलयुक्त शिवाराच्या जलसंधारणाच्या विविध कामामुळे जलसिंचन साठ्यात वाढ होवून संरक्षित पाण्यात वाढ होते. जलसाठा वाढल्याने पिकांच्या उत्पादनासोबत गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत असल्याचे सांगितले.

Web Title: Water Plant Scheme Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.