कालवा फुटून शेतात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 10:47 PM2018-07-18T22:47:37+5:302018-07-18T22:47:52+5:30

रावणवाडी ते अर्जुनी दरम्यानचा कालवा बुझलेला आहे. पावसाच्या पाण्यामुळे सदर कालवा फुटून गावाच्या सीमेत व शेतात पाणी घुसले. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेचे शाखा अभियंता यांना केली आहे.

Water entered into the field by the canal | कालवा फुटून शेतात शिरले पाणी

कालवा फुटून शेतात शिरले पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देपिकांचे नुकसान : सिंचन विभागाकडे शेतकऱ्यांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
रावणवाडी : रावणवाडी ते अर्जुनी दरम्यानचा कालवा बुझलेला आहे. पावसाच्या पाण्यामुळे सदर कालवा फुटून गावाच्या सीमेत व शेतात पाणी घुसले. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेचे शाखा अभियंता यांना केली आहे.
सन २०१८ मध्ये रावणवाडी ते अर्जुनी दरम्यान कालव्याचे खोदकाम व बांधकाम करण्यात आले. सध्या तो कालवा बुझून गेला आहे. त्यात पावसाचे पाणी भरून गेल्याने कालवा फुटला व ते पाणी गावाच्या सीमेत तसेच शेतातील पिकांमध्ये शिरले. त्यामुळे शेतात लावण्यात आलेले पीक वाहून गेले व मोठे नुकसान झाले. तसेच गावाच्या सीमेत पाणी घुसल्याने ग्रामस्थांना समस्या निर्माण झाली.
सदर प्रकाराकडे लक्ष देवून कालवा व शेतातील पीक पाहणी करावी.
तसेच शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अर्जुनीचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर शहारे, ओमकार रहांगडाले, पंचम बिसेन, तिलकचंद रहांगडाले आदी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Water entered into the field by the canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.