ठळक मुद्देसहषराम कोरोटे : सरपंच व सदस्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : काँग्रेस पक्ष त्याग, समर्पण व विकासकार्य करणारा पक्ष आहे. आज देश व राज्यातील भाजपच्या सरकार सर्वसामान्य व गरीब लोकांचे जीवनमान दूषित करण्याचे काम करीत आहे. सर्वसामान्य जनतेला या बाबी सांगून सर्वाधिक सरपंच व सदस्य निवडून आणण्याचे काम आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य निष्ठावंत सक्रिय कार्यकर्त्यांनी केले आहे. त्यामुळेच या क्षेत्रात भाजपचा आमदार असूनही सर्वाधिक ग्रा.पं.वर काँग्रेस समर्थित सरपंच व सदस्य निवडून आले. हा विजय काँग्रेस पक्षातील पुढाºयांचा नसून सर्वसामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले.
ते आमगाव येथे विजयालक्ष्मी सभागृहात काँग्रेस पक्ष समर्थित तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार आणि पक्ष प्रवेश कार्यक्रमात बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरत बहेकार होते. या वेळी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
या वेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमगाव तालुकाध्यक्ष धिरेश पटेल, जिल्हा महासचिव यादनलाल बनोठे, माजी अध्यक्ष नटवरलाल गांधी, बंसीलाल अग्रवाल, पं.स. सभापती हेमलता डोये, पं.स. सदस्य लोकेश अग्रवाल, छबू उके, जमील खान पठान, बळीराम कोटवार, वसंत पुराम, एन.एस.यू.आय.चे तालुकाध्यक्ष उज्वल ठाकूर, तालुका काँग्रेसचे महासचिव दीपक शर्मा, राधेलाल रहांगडाले यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, सरपंच, सदस्य, महिला व पुरुष तथा युवा वर्ग उपस्थित होता.
प्रास्ताविक कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष धिरेश पटेल यांनी मांडले. संचालन तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष जगदीश चुटे यांनी केले. आभार डॉ. गणेश हरिणखेडे यांनी मानले.