Two deer killed in train crash; Events on Gondia Ballarshah Road | नववर्षारंभी रेल्वेच्या धडकेत दोन हरीण ठार; गोंदिया बल्लारशाह मार्गावरील घटना

ठळक मुद्देपिंडकेपार रेल्वेस्टेशनजवळ झाला अपघात

आॅनलाईन लोकमत
गोंदिया:    गोंदिया-बल्लारशाह दरम्यान असलेल्या पिंडकेपार या रेल्वेस्थानकालगत रेल्वेगाडीचा धक्का लागून दोन हरीण ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. गोंदिया-बल्लारशाह या पॅसेंजर गाडीखाली सकाळी 7.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या भागात नवेगाव बांध हा वनसंरक्षित प्रदेश असून येथे हरिणांचा बाहेर वावर नेहमीच आढळून येतो. या घटनेची चौकशी करण्यात येत असून गोरेगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन हरिणांचा पंचनामा केला. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.