गोंदिया जिल्ह्यातील ओवारा धरणात बुडून दोन बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 06:48 PM2018-05-22T18:48:57+5:302018-05-22T18:49:04+5:30

देवरी तालुक्यातील ओवारा धरणात आंघोळीकरीता गेलेल्या चार बालकांपैकी दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला. तर दोन बालकांना सुखरुप बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले. ही घटना मंगळवार (दि.२२) सकाळी ११.३० वाजता घडली.

Two children die drowning in Ovara dam in Gondia district | गोंदिया जिल्ह्यातील ओवारा धरणात बुडून दोन बालकांचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील ओवारा धरणात बुडून दोन बालकांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देदोन जण बचावलेदेवरी तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देवरी तालुक्यातील ओवारा धरणात आंघोळीकरीता गेलेल्या चार बालकांपैकी दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला. तर दोन बालकांना सुखरुप बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले. ही घटना मंगळवार (दि.२२) सकाळी ११.३० वाजता घडली.
मृतकांमध्ये शुभम रामचंद्र मोरदेवे (१३), अश्विनी भोजराज मेश्राम (१४) यांचा समावेश आहे. तर विश्वेश्वरी परतेती (१४) आणि रोशनी मोरदेवे (१३) यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. प्राप्त माहितीनुसार शुभम, अश्विनी, रोशनी आणि विश्वेश्वरी ही चारही ओवार येथील चारही बालके सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ओवारा धरणावर आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान, ही चारही बालके आंघोळीसाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा थांग न लागल्याने पाण्यात बुडायला लागले. दरम्यान धरणावर कपडे धुत असलेल्या महिलांना बालके बुडत असल्याचे आढळताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे आजुबाजुच्या शेतामध्ये काम करीत असलेल्या मजुर व गावकऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली. तसेच बुडत असलेल्या बालकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र शुभम व अश्विनी यांचा मृत्यू झाला. तर विश्वेश्वरी आणि रोशनी यांना सुखरुप बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी देवरी पोलीस स्टेशन दिली. या घटनेमुळे ओवारा गावात शोककळा पसरली आहे.

Web Title: Two children die drowning in Ovara dam in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात