दोन कारची आपसात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 09:31 PM2018-04-21T21:31:45+5:302018-04-21T21:31:45+5:30

भरधाव वेगात असलेल्या दोन कारची आपसांत धडक झाली व दोन्ही कार रस्त्याच्या बाजूला उतरल्या. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील धोबीसराड गावाजवळ शनिवारी (दि.२१) सायंकाळी ४.३० वाजतादरम्यान ही घटना घडली.

Two cars collide with each other | दोन कारची आपसात धडक

दोन कारची आपसात धडक

Next
ठळक मुद्देभरधाव वेगात असलेल्या दोन कारची आपसांत धडक झाली व दोन्ही कार रस्त्याच्या बाजूला उतरल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : भरधाव वेगात असलेल्या दोन कारची आपसांत धडक झाली व दोन्ही कार रस्त्याच्या बाजूला उतरल्या. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील धोबीसराड गावाजवळ शनिवारी (दि.२१) सायंकाळी ४.३० वाजतादरम्यान ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दूल अंसारी हे आपल्या परिवारासह कार क्रमांक एमएच ३५- बीएच ६२३१ ने सातारावरून झारखंड येथे लग्न सोहळ््यात जात होते. तर महेंद्र पवार हे कार क्रमांक एमएच ३५-पी ४०५७ ने आमगाव वरून मुंडीपार येथे लग्न सोहळ््यातील वºहाड्यांना घेण्यासाठी जात होते.
धोबीसराड जवळ कार चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले व कारची आपसांत धडक झाली. या धडकेनंतर दोन्ही कार रस्त्याच्या कडले उतरल्या. विशेष म्हणजे, कारमधील प्रवाशांचे नशीब बलवत्तर की, जिवीत हानी तर झाली नाहीच शिवाय कुणालाही जबर मार लागला नाही.

Web Title: Two cars collide with each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात