रेल्वेगाडीची प्रतिक्षा रेल्वे रुळावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:38 PM2017-10-23T12:38:01+5:302017-10-23T12:42:03+5:30

गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी या गावाला रेल्वे स्थानक नसल्याने येथील प्रवाशांना रेल्वेरुळालगत झाडांचा आधार घेत, उन पाऊस सहन करीत उघड्यावरच बसून रहावे लागते आहे.

Train passengers waiting on railway track | रेल्वेगाडीची प्रतिक्षा रेल्वे रुळावरच

रेल्वेगाडीची प्रतिक्षा रेल्वे रुळावरच

Next
ठळक मुद्देपानटपरीवर होते तिकीटविक्रीदररोज धावतात १० ते १२ प्रवासी गाड्यारेल्वे स्थानक नसल्याने प्रचंड गैरसोय

बबलू मारवाडे
आॅनलाईन लोकमत
गोंदिया: गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी या गावाला रेल्वे स्थानक नसल्याने येथील प्रवाशांना रेल्वेरुळालगत झाडांचा आधार घेत, उन पाऊस सहन करीत उघड्यावरच बसून रहावे लागते आहे. काही प्रवासी ही प्रतिक्षा रेल्वे रुळावरच बसून करत असल्याचेही दृश्य येथे पहायला मिळते.
या मार्गावरून दररोज किमान १० ते १२ प्रवासी गाड्या धावतात. मात्र खोडशिवनीला रेल्वे स्थानकच नाही, फक्त रेल्वे सिग्नलची एकमेव केबिन आहे. या ठिकाणी रेल्वे विभागातील कुठलाही कर्मचारी नियुक्त केलेला नाही. त्यामुळे येथे प्रवाशांना तिकिटाची विक्री चक्क एका पानटपरीवरून केली जाते. या टपरीवर असलेली महिलाच प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थानकांची तिकिटे विकते.
खोडशिवनी हे गाव तसे नवीन नाही. ते स्वातंत्र् योत्तर काळातले असले तरी आता त्याला किमान ५० ते ६० वर्षांचा इतिहास आहे. या गावाला एक लहानसे रेल्वे स्थानक मिळावे अशी येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

Web Title: Train passengers waiting on railway track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.