गोंदियाच्या खुर्शीपार जंगलात झाली तीन हरिणांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:53 AM2018-02-17T11:53:07+5:302018-02-17T11:55:42+5:30

आमगाव वनपरिक्षेत्रातंर्गत येणार्या मानेगाव क्षेत्रातील खुर्शीपार जंगलात तीन हरिणांची अज्ञात शिकाऱ्यांनी शिकार केल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Three deer hunts in Gondiya's Khurdshapar forest | गोंदियाच्या खुर्शीपार जंगलात झाली तीन हरिणांची शिकार

गोंदियाच्या खुर्शीपार जंगलात झाली तीन हरिणांची शिकार

googlenewsNext
ठळक मुद्देविषबाधेने मृत्यू झाल्याचा संशयदोन हरणांची शिंगे गायब

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आमगाव वनपरिक्षेत्रातंर्गत येणार्या मानेगाव क्षेत्रातील खुर्शीपार जंगलात तीन हरिणांची अज्ञात शिकाऱ्यांनी शिकार केल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मानेगाव दहेगाव हे जंगलव्याप्त क्षेत्र असून आज एक शेतकरी जंगलाच्या मार्गाने शेतात जात असताना त्याला तीन हरणे मृतावस्थेत आढळून आली. दरम्यान त्यांनी ही माहिती वनविभागाचे अधिकाऱ्यांना दिली. वनविभागाचे अधिकारी आपल्या ताफ्यासह खुर्शीपार भागातील जंगलात पोहचले असता, त्यांना तीन हरणे मृतावस्थेत आढळली. त्यापैकी दोघांचे शिंग कापलेले होते. हरिणांची स्थिती पाहता, विजेच्या प्रवाहाने त्यांचा मृत्यू झाला नसावा मात्र विषबाधेमुळे असू शकतो असा अंदाज वनपरिक्षेत्राधिकारी प्रदिप चन्ने यांनी व्यक्त केला असून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र,तीन हरीणांपैकी दोन हरिणांचे शिंग गायब असल्याने कदाचित जादूटोण्यासाठी या हरिणांची शिकार करण्यात आल्याची चर्चा तालुक्यात आहे.

Web Title: Three deer hunts in Gondiya's Khurdshapar forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.