भर उन्हाळ्यात नळ योजना दुरूस्तीसाठी निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 09:52 PM2019-05-15T21:52:48+5:302019-05-15T21:53:11+5:30

उन्हाळ्यापूर्वी पाणी टंचाईपूर्व उपाय योजना राबविण्यात यंदा जिल्हा प्रशासन पूर्ण अपयशी ठरले.परिणामी जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच भर म्हणजे जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने नळ योजना दुरूस्तीच्या कामासाठी १३ मे रोजी निविदा मागविली.

Tender for the summer tap maintenance plan | भर उन्हाळ्यात नळ योजना दुरूस्तीसाठी निविदा

भर उन्हाळ्यात नळ योजना दुरूस्तीसाठी निविदा

googlenewsNext
ठळक मुद्देपाणीपुरवठा विभागाचा प्रताप : गावकऱ्यांची पाण्यासाठी पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उन्हाळ्यापूर्वी पाणी टंचाईपूर्व उपाय योजना राबविण्यात यंदा जिल्हा प्रशासन पूर्ण अपयशी ठरले.परिणामी जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच भर म्हणजे जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने नळ योजना दुरूस्तीच्या कामासाठी १३ मे रोजी निविदा मागविली. यावरुन हा विभाग कितपत तत्पर आहे याची प्रचिती येत आहे.
जिल्हावासीयांना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागू नये, यासाठी प्रशासनातर्फे जानेवारी महिन्यापासून आराखडा तयार केला जातो. यंदा भूजल सर्वेक्षण विभागाने उन्हाळ्यात जिल्ह्यातील ३९८ गावे आणि वाड्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला सादर केलेल्या आराखड्यातून सुचविली होती. त्यादृष्टीने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने उपाय योजना सुरू करणे अपेक्षीत होते. मात्र या विभागाच्या वेळ काढू धोरणामुळे पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना केवळ कागदावरच राहिल्या. याच दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने या विभागाला वेळ मारुन नेण्यासाठी पुन्हा कालावधी मिळाला.परिणामी मे महिना उजाळूनही पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजनेची कामे सुरू झाली नाही. अनेक गावातील बोअरवेल विहिरींनी तळ गाठला आहे. तर काही ठिकाणी नळ योजना बंद आहे. ९६७ च्यावर बोअरवेलची दुरूस्ती त्यासाठी साहित्य उपलब्ध नसल्याने झाली नाही. बोअरवेलसाठी लागणाºया पाईपचा सुध्दा तुटवडा परिणामी अनेक बोअरवेलमधून पाणी येत नसल्याने ग्रामीण भागातील महिलांना बाकीची सर्व कामे सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तर प्रशासनाकडून पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या या दाव्याची स्वत: या विभागानेच पोल खोल केली आहे. गोंदिया तालुक्यातील तीन गावातील नळ योजेच्या दुरूस्तीसाठी सोमवारी (दि.१३) निविदा मागविण्यात आल्या.त्यामुळे या निविदा केव्हा उघडणार आणि काम केव्हा सुरू होणार तोपर्यंत कदाचित उन्हाळा संपलेलाही असेल अशी स्थिती आहे.

दरवर्षी समस्या तरी धडा नाहीच
जिल्ह्यात दरवर्षी पाणी टंचाईची समस्या निर्माण होते.जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला सुध्दा कोणता तालुक्यात पाणी टंचाईची सर्वाधिक समस्या निर्माण होवू शकतो याचा अंदाज असतो.त्यामुळे त्यादृष्टीने पूर्व तयारी केली असती तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले नसते. मे महिना उजाळूनही या विभागाने बोअरवेल व तसेच नळ योजनेच्या दुरूस्तीसाठी लागणारे साहित्य खरेदी केले नाही.त्यावरुन या विभागाला जनतेची किती काळजी आहे दिसून येते.

आढावा बैठकातून मलमपट्टी
जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली असून ग्रामीण भागातील नागरिकांची ओरड वाढली आहे. प्रशासनाप्रती तीव्र रोष व्याप्त आहे.हा रोष कमी करुन त्यावर मलमपट्टी करण्यासाठी आता प्रत्येक पंचायत समितीस्तरावर पाणी टंचाईच्या आढावा बैठका घेतल्या जात आहे. तसेच काय उपाय योजना करण्याची गरज आहे यासाठी सूचना मागविल्या जात आहे. त्यामुळे प्रशासन किती सजग आहे हे दिसून येते.
वरिष्ठांचा वचक हरविला
जि.प.च्या विविध विभागांमध्ये सध्या बराच सावळा गोंधळ सुरू आहे. त्याच जि.प.तील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हा देखील एक महत्त्वपूर्ण विभाग आहे. मात्र उन्हाळा संपत येत असला तरी पाणी टंचाईच्या उपाय योजनांचा पत्ता नाही.त्यावरुन वरिष्ठांचा वचक राहिला नसल्याचे दिसून येते.

Web Title: Tender for the summer tap maintenance plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.