बीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीवर तात्पुरती मलमपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:16 PM2019-07-17T22:16:20+5:302019-07-17T22:16:58+5:30

मागील वर्षी पावसाळ्यात येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या (बीजीडब्ल्यू) प्रसुती वार्डात पाणी साचले होते. त्यामुळे महिला रुग्णांची गैरसोय झाली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर या इमारतीचे स्ट्रॅक्चरल आॅडिट करण्यात आले.

Temporary bandage on the BW hospital building | बीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीवर तात्पुरती मलमपट्टी

बीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीवर तात्पुरती मलमपट्टी

Next
ठळक मुद्दे१ फूट उंची वाढविणार : वॉर्ड केला खाली, अधिकाऱ्यांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील वर्षी पावसाळ्यात येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या (बीजीडब्ल्यू) प्रसुती वार्डात पाणी साचले होते. त्यामुळे महिला रुग्णांची गैरसोय झाली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर या इमारतीचे स्ट्रॅक्चरल आॅडिट करण्यात आले. त्यात ही इमारत जीर्ण झाली असल्याचीे बाब पुढे आली होती. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग या इमारतीची उंची १ फूट वाढवून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करीत आहे.
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या (बीजीडब्ल्यू) वार्डात पाणी साचल्यानंतर या रुग्णालयातील अनागोंदी कारभार आणि प्रशासनाच्या वेळ काढू धोरणाची पोलखोल झाली होती.मागील वर्षी ६ जुलैला या रुग्णालयाच्या इमारतीत पाणी साचले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर तीन वर्षांपासून बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिटच सार्वजनिक बांधकाम विभागाने केले नसल्याची बाब पुढे आली होती. जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना वेळीच उपचार मिळावा, यासाठी शासनाने गोंदिया येथे बाई गंगाबाई महिला रुग्णालय सुरु केले.
रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम १९३९ मध्ये करण्यात आले. एकूण दोनशे खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात सध्या केवळ १८५ खाटाच उपलब्ध आहे. त्यामुळे बरेचदा दाखल रुग्णांची सख्या वाढल्यास त्यांना रुग्णालयाच्या वºहांड्यात खाटा लावून दाखल केले जाते. रुग्णालयाच्या इमारतीला ८० वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे इमारत जीर्ण झाली आहे. पावसाळ्यात काही ठिकाणी गळती लागते. या रूग्णालयात महिला तसेच लहान बालकांना दाखल करुन उपचार केले जाते. त्यामुळेच जीर्ण झालेल्या इमारतीमुळे रुग्णांच्या जीवाला कुठलाही धोका होवू नये, यासाठी या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी बीेजीडब्ल्यू रुग्णालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला २०१५ पासून वांरवार पत्र दिले.पण तीन वर्षांचा कालावधी लोटूनही बांधकाम विभागाने इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट केले नव्हते. त्यानंतर लोकमतने हा विषय लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून आठ दिवसात इमारतीचा अहवाल मागीतला होता. त्यानंतर इमारतीचे स्ट्रक्टचरल आॅडिट करण्यात आले होते. याला वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतर मंगळवारी (दि.१६) सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी रुग्णालयाला भेट देऊन इमारतीची पाहणी केली. तसेच या इमारतीची उंची १ फुटाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या रुग्णालयातील महिला वार्ड खाली करण्यात आला असून लवकरच बांधकामाला सुरूवात केली जाणार आहे.यासाठी शासनाने मागील वर्षी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याच निधीतून हे काम करण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेने अधिकारी संभ्रमात
बीजीडब्ल्यू रुग्णालयाची जीर्ण झालेली इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत तयार करण्यात येणार आहे. त्याचा प्रस्ताव सुध्दा मंजूर झाला आहे. मात्र आता पावसाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीची उंची १ फुटाने वाढविण्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण यानंतरही पाणी साचण्याची समस्या कायम राहणार आहे. त्यामुळे किमान ३ फूट उंची वाढविणे आवश्यक होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि डॉक्टर सुध्दा संभ्रमात आहेत.

पावसाळ्यात कामाला सुरूवात
मागील वर्षी ६ जुलैला बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या महिला वार्डात पाणी गुडघाभर पाणी साचले होते. त्यानंतर त्वरीत उपाय योजना करण्याऐवजी तब्बल वर्षभरानंतर कामाला सुरूवात करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून जोराचा पाऊस आल्यास पुन्हा रुग्णालयात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पावसामुळे काम ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गरज ३ फुटाची वाढविली १ फूट
बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीला ८० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असून ही इमारत जीर्ण झाली आहे. इमारतीच्या परिसरातील रस्त्यापेक्षा इमारतीची उंची कमी असल्याने रस्त्यावरील पाणी इमारतीच्या वार्डात साचते.त्यामुळे स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये इमारतीची उंची ३ फूट वाढविण्याचे सूचविण्यात आले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीची उंची १ फुटाने वाढविण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्टोअररुममध्ये साचते गुडघाभर पाणी
बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या केवळ महिला वार्डातच पाणी साचत नाही तर या रुग्णालयाच्या स्टोअररुममध्ये सुध्दा गुडघाभर पाणी साचते. स्टोअररुममध्ये सलाईन, सिरींज, गोळ्या आणि औषधांचे बॉक्स ठेवले जातात. पण या रुममध्ये पाणी साचत असल्याने ते सुध्दा खराब होतात. मात्र यावर अद्यापही कुठलीही उपाय योजना करण्यात आली नाही.

Web Title: Temporary bandage on the BW hospital building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.