दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:18 AM2017-08-17T00:18:39+5:302017-08-17T00:19:24+5:30

मागासवर्गातील युवक उद्योजक झाले पाहिजेत. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी क्रिमीलेअरची मर्यादा साडेचार लाखावरून सहा लाख करण्याचा निर्णय

 Strive to get justice for the weak | दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

Next
ठळक मुद्देपालकमंत्री: विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाºयांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागासवर्गातील युवक उद्योजक झाले पाहिजेत. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी क्रिमीलेअरची मर्यादा साडेचार लाखावरून सहा लाख करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणकि हिताच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. समाजातील उपेक्षीत, वंचित, दुर्बल घटकांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
१५ आॅगस्ट रोजी कारंजा येथील पोलीस मैदानावर भारतीय स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापन दिनाच्या शासकीय ध्वजारोहणाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, उपवनसंरक्षक एस.युवराज, माजी आ. डॉ.खुशाल बोपचे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करु न देण्यात रोजगार हमी योजना जिल्ह्यात यशस्वी ठरली. जिल्हाधिकाºयांच्या प्रोत्साहनामुळे शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री पीक विमा योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हा वार्षिक योजनेतून दिव्यांगांच्या विकासासाठी ३ टक्के निधीची तरतूद केली आहे. ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही अश्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील कुटूंबांसाठी २५७४ रमाई आवास योजनेची घरे बांधून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध बँकांकडून ४५ हजार ७२६ शेतकºयांना १९८ कोटीचे खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले. वनालगत असलेल्या गावातील कुटूंबांचे वनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ४१७४ कुटुंबांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात आले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेल्या व त्यांच्याशी संबंधित राज्यातील २८ स्थळांचा विकास करून त्यांना पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येणार आहे.
शेतकºयांना कृषिपंपासाठी सातही दिवस वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषि फिडर योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अपूर्ण अवस्थेतील सिंचन प्रकल्पाची कामे त्वरित पूर्ण करून जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणाले.
कार्यक्र माला अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.रूखमोडे, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बागडे, राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विलास निखारे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा क्र ीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले. पोलीस पथक, शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथक, होमगार्ड पथक, बँड पथक, बिट मार्शल पथक, निर्भया पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक, फिरते न्यायवैद्यक पथक, रूग्णवाहिका पथक व अग्नीशमन पथक यांनी संचलन केले.
यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामिगरी करणाºया व्यक्तींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन व आभार मंजूश्री देशपांडे यांनी केले.

Web Title:  Strive to get justice for the weak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.