दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 09:32 PM2018-10-14T21:32:49+5:302018-10-14T21:33:18+5:30

पूर्वी दिव्यांगांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे त्यांना योग्य त्या प्रमाणात लाभ मिळत नव्हता. आता झिरो पेंडंसी अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांना शंभर टक्के प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता दिव्यांग बांधवाना योग्य लाभ मिळत आहे.

Strive for the all-round development of the Divyangas | दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : दिव्यांगांना नि:शुल्क सहायक उपकरण वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पूर्वी दिव्यांगांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे त्यांना योग्य त्या प्रमाणात लाभ मिळत नव्हता. आता झिरो पेंडंसी अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांना शंभर टक्के प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता दिव्यांग बांधवाना योग्य लाभ मिळत आहे.
दिव्यांगासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करु न त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात शनिवारी (दि.१३) आयोजीत दिव्यांगांना नि:शुल्क सहायक उपकरण वितरण कार्यक्र मात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते.
याप्रसंगी आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जिल्हा परिषद समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने प्रामुख्याने उपस्थितहोते. पुढे बोलताना बडोले यांनी, दिव्यांग बांधवांच्या विकासाठी असलेला विविध योजनेतील निधी तीन टक्क्यावरु न पाच टक्के करण्यात आला आहे. झिरो पेंडंसी अंतर्गत जिल्ह्यातील अपंग बांधवांना शंभर टक्के प्रमाणपत्र वाटपकरण्यात आले आहे.
दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी प्रतिष्ठान निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे असे सांगितले. आमदार अग्रवाल यांनी, जिल्ह्यातील दिव्यांगांना नि:शुल्क सहायक उपकरणे वितरण करण्यात येत आहे हा एक स्तुत्य असल्याचे मत व्यक्त केले.
आमदार रहांगडाले यांनी, शासनाच्या विविध योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचल्यापाहिजे, जेणेकरु न दिव्यांग बांधवांचे जीवन सुखी होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांनी मांडले. संचालन प्रदिप ढवळे यांनी केले. आभार उपायुक्त तथा जिल्हा जात पडताळणी सदस्य देवसूदन धारगावे यांनी मानले.
कार्यक्रमाला समाजकल्याण सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, विभागीय निरिक्षक महेंद्र माने, दिव्यांग बांधव व त्यांचे पालक तसेच नातेवाईक मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्र मासाठी समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

दिव्यांगांना साहित्य व धनादेश वाटप
कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरु पात मुकेश बडगे यांना स्मार्ट फोन, भूजल रहांगडाले यांना मोबाईल फोन, चंद्रशेखर सहारे व सुरेखा सहारे यांना श्रवणयंत्र, नेहा रहांगडाले व कुणाल आसोले यांना एम.आर.कीट, मंदीप वासनिक-स्मार्ट केन, बाबुलाल रहांगडाले-वॉकींग स्टीक, प्रमिला भांडारकर-कुबडी, अभिषेक बरडे व भुमेश्वर रहांगडाले यांना सी.पी.चेअर, अनमोल नागपुरे यांना व्हीलचेअर, विनोद बरडे, आत्माराम चुटे व ममता नागरिकर यांना ट्रायसिकल वाटप करण्यात आल्या. तसेच नामदार बडोले यांच्या हस्ते महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत राजु साखरे व निलकंठ सरजारे यांना प्रत्येकी पाच लक्ष रु पयांचा धनादेश वितरीत करण्यात आला.

Web Title: Strive for the all-round development of the Divyangas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.