पक्ष संघटन मजबूत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:44 PM2018-02-28T22:44:05+5:302018-02-28T22:44:05+5:30

सामान्य जनता अपप्रचाराला बळी पडल्याने मागील निवडणुकीत आमचा पराभव झाला. यासाठी आम्हाला सुद्धा आत्मचिंतन करावे लागेल. ते आम्ही करीत आहोत.

Strengthen party organization | पक्ष संघटन मजबूत करा

पक्ष संघटन मजबूत करा

Next
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : प्रत्येक गाव व शहरातील प्रभागात नियुक्त होतील पर्यवेक्षक

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : सामान्य जनता अपप्रचाराला बळी पडल्याने मागील निवडणुकीत आमचा पराभव झाला. यासाठी आम्हाला सुद्धा आत्मचिंतन करावे लागेल. ते आम्ही करीत आहोत. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्ष संघटन बळकट करावे असे आवाहन खा. प्रफुल्ल पटेल यांनी यांनी येथे केले.
राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची बैठक खा. पटेल यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या निवासस्थानी पार पडली. या वेळी ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
याप्रसंगी माजी आ. राजेंद्र जैन, अनिल बावणकर, दिलीप बन्सोड, नाना पंचबुद्धे, नरेश माहेश्वरी, विजय शिवणकर, विनोद हरिणखेडे, मधू कुकडे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, रामू चौधरी, मनोहर चंद्रिकापुरे, रेखा ठाकरे, धनेंद्र तुरकर, अशोक गुप्ता, गंगाधर परशुरामकर, विजय डेकाटे, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे, पंचम बिसेन, रमेश ताराम, निता रहांगडाले, वंदना बोरकर, अभिषेक कारेमोरे, केतन तुरकर, कल्याणी भुरे, डॉ. अविनाश काशीवार, चुन्नी बेंद्रे, अशोक शहारे, कुंदन कटारे, छोटू पटले, शुभांगी रहांगडाले, सुमन बिसेन उपस्थित होते.
पटेल म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अनेक विकास कामे करण्यात आली. यामुळे या दोन्ही जिल्ह्यात रोेजगाराच्या संधी निर्माण झाल्या. संपूर्ण देशात गोंदिया-भंडारा नावारूपास आले. मात्र केंद्र व राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारने जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून दिशाभूल केली. गोंदिया-भंडाºयाचा विकास खुंटल्याचा आरोप केला. आता सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे. राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच शालीनतेचे परिचय दिला आहे. कार्यकर्त्यांनी गावा गावात पक्षाचे कार्य पोहचवावे. तसेच गोरगरिबांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. कार्यकर्ते व पदाधिकाºयांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, सर्व पदाधिकारी सदस्यता अभियानाच्या मोहिमेत सक्रियतेने कार्य करावे. गावागावात राष्टÑवादी काँग्रेसच्या विचारधारेशी लोकांना जोडण्याचे प्रयत्न करावे. आता भाजपने सांप्रदायिकतेचे वातावरण निर्माण करून भावाभावांमध्ये भांडण लावण्याचे काम सुरू केले आहे. ते व्होट बँकेचे राजकारण करीत आहेत. पण आम्हाला भावाला भावाशी जोडून बंधुभाव वाढविण्यासाठी काम करायचे आहे. चांगले लोक व चांगले कार्य करणारे यांना राष्टÑवादी काँग्रेससह जोडा. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य आदी सर्वच क्षेत्रात राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी कार्य करावे. आहेत, असे त्यांनी सांगितले.
या वेळी दोेन्ही जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Strengthen party organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.