वेतन कपातीविरुद्ध आक्रोश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 09:52 PM2018-09-19T21:52:58+5:302018-09-19T21:53:14+5:30

७ ते ९ आॅगस्ट रोजी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात सहभागी झालेल्या स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात आले. याविरुद्ध बुधवारी जिल्ह्यातील विविध कर्मचारी संवर्गाच्या संघटनांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन केले.

Squeaking movement against wages cut | वेतन कपातीविरुद्ध आक्रोश आंदोलन

वेतन कपातीविरुद्ध आक्रोश आंदोलन

Next
ठळक मुद्देविविध कर्मचारी संवर्ग संघटना आंदोलनात सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : ७ ते ९ आॅगस्ट रोजी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात सहभागी झालेल्या स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात आले. याविरुद्ध बुधवारी जिल्ह्यातील विविध कर्मचारी संवर्गाच्या संघटनांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन केले.
सातवा वेतन आयोग व सर्व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन अशा विविध मागण्यांसाठी राज्य कर्मचारी संघटनांनी संप पुकारला होता. या संपात अनेक संवर्गातील कर्मचारी संपात सहभागी झाले होते. या कर्मचाऱ्यांचा वेतन कपात करण्यासंदर्भात गोंदिया जिल्हा परिषदेने निर्णय घेतला. याची स्थानिक पंचायत समितीने अंमलबजावणी केली. याचा उद्रेक उफाळून आला. संपकालीन तीन दिवसाचा वेतन कपात करण्यात आला. याविरुद्ध जिल्हा परिषद कर्मचारी संघटना तसेच महसूल विभागाच्या ंघटनांचे एकत्रीकरण होवून बुधवारी असहकार आंदोलन करण्यात आले. यापूर्वी या राज्यव्यापी संघटनांनी संपकालीन काळातील वेतन कपात करु नये असे पत्र देण्यात आले होते. अन्यथा वेतन कपात करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्ररा नोंदविण्यासंदर्भात कळविले हते. मात्र जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रतिवाद दिला नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यात संपकालीन कर्माचाºयांचे वेतन कपात झाले नसतानाही गोंदिया जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतल्यामुळे कर्मचारी वर्गात असंतोष उफाळून आला. याविरुद्ध हे आंदोलन पुकारण्यात आले.
बुधवारी येथे गोंदिया जिल्हा महासंघाचे अध्यक्ष पी.जी. शहारे, सचिव शैलेष बैस, मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक लिलाधर पाथोडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षित, एल.यू. खोब्रागडे, विनोद बडोले, सिद्धार्थ खोब्रागडे, कैलास हांडगे, श्रीकृष्ण कहालकर, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कुथे, अजय खरवडे, कमलेश बिसेन, गुणवंत ठाकूर, लक्ष्मण ठाकरे, आर.एस. संग्रामे, एम.आर. मिश्रा, दयानंद फटिंग, लिलाधर तिबुडे, डी.एस. लोहबरे, आर.डी. वलथरे, वनपाल संघटनेचे शैलेष भदाणे, आशिष रामटेके, बी.डी. नेवारे, विरेंद्र कटरे, राजू लदरे, हरिराम येळणे, प्रकाश कुंभरे, आर.एफ. सांगोडे, विजय नेवारे, व्ही.आर. कटरे, मुलचंद रतनपुरे, विजय मडावी व संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन कुथे, संचालन पवनकुमार पवार यांनी केले. डी.एस. लोहबरे यांनी आभार मानले.

Web Title: Squeaking movement against wages cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.