निधी उपलब्ध असलेल्या संकुलाच्या कामांना गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 01:11 AM2018-10-10T01:11:16+5:302018-10-10T01:11:36+5:30

येथील पर्यटन संकुल परिसरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध आहे. मात्र अद्यापही कामाला सुरूवात करण्यात आली नाही. त्यामुळे या कामांना गती देण्याची मागणी नवेगावबांध फाऊंडेशनने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Speed ​​up the work of funds available | निधी उपलब्ध असलेल्या संकुलाच्या कामांना गती द्या

निधी उपलब्ध असलेल्या संकुलाच्या कामांना गती द्या

googlenewsNext
ठळक मुद्देनवेगावबांध फाऊंडेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : येथील पर्यटन संकुल परिसरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध आहे. मात्र अद्यापही कामाला सुरूवात करण्यात आली नाही. त्यामुळे या कामांना गती देण्याची मागणी नवेगावबांध फाऊंडेशनने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
नवेगावबांध पर्यटन संकुल परिसराच्या विकासाकरीता राज्य शासनाच्या विधी विभागाने प्रादेशिक पर्यटन अंतर्गत ४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून प्र्रवेशद्वारा, इंटरप्रिटीशन सभागृह, अंतर्गत रस्ते, बगीच्याचे नुतनीकरण, पायाभूत सुविधा, नैसर्गिक पायवाट व तसेच इतर कामे प्रस्तावित आहेत. पाटबंधारे विभागाच्या तलावा शेजारी बीच, सभोवताल ग्रील, जेटी पार्इंटवर बैठक व्यवस्था यासाठी १ कोटी रुपये मंजूर आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वनविभागद्वारे हिलटॉप गार्डन व विश्रामगृह बांधकामासाठी १ कोटी २० लाखाचा निधी उपलब्ध आहे. नियोजन विभागाच्या २६ लाख रुपयांचा निधी हिलटॉप गार्डनच्या नुतनीकरणासाठी मंजूर केला आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडे एडव्हेंचर स्पोर्ट, नौका विहार, जीपलाईन, रोपवेकरीता ९३ लाखांचा निधी मंजूर आहे. असा एकूण ८ कोटी ३८ लाखाचा निधी मंजूर असूनही एकाही कामाला अद्याप सुरूवात झालेली नाही.
पर्यटन संकुलाच्या विकासाकरीता व स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी निधी उपलब्ध असलेल्या कामांना त्वरीत सुरु करण्याचे निर्देश संबंधितांना देण्याची मागणी केली.
२० जुलै २०१७ ला पर्यटन संकुलात पालकमंत्री ना. बडोले यांच्या बैठकीत ३ किमीची मिनीट्रेन, थायलंडच्या धर्तीवर प्राणी संग्रहालय आदी काम प्रस्तावीत करण्याचे ठरले होते.
या कामांचे प्रस्ताव तयार करुन त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी या वेळी फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
शिष्टमंडळात फाऊंडेशनचे अध्यक्ष रामदास बोरकर, सचिव विजय डोये, सरपंच अनिरुध्द शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, एकनाथ बोरकर, रितेश जायस्वाल, शितल राऊत, रेशिम काशिवार यांचा समावेश होता. या समस्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन बलकवडे यांनी शिष्टमंडळाला दिले.

Web Title: Speed ​​up the work of funds available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.