दारुची तस्करी करणारे वाहन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:37 PM2019-07-18T22:37:23+5:302019-07-18T22:37:40+5:30

अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करीत असलेली इंडिका अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी पकडली.ईटखेडा गावासमोरील वळणावर बुधवारी (दि.१७) रात्री १ वाजतादरम्यान ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, कार सोडून चालक पसार झाला. पोलिसांनी वाहनासह दोन लाख ८० हजार ६०० रूपयांचा माल जप्त केला.

A smuggling vehicle seized | दारुची तस्करी करणारे वाहन जप्त

दारुची तस्करी करणारे वाहन जप्त

googlenewsNext
ठळक मुद्दे३४ हजार रूपयांची दारू जप्त : ईटखेडा गावाजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करीत असलेली इंडिका अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी पकडली.ईटखेडा गावासमोरील वळणावर बुधवारी (दि.१७) रात्री १ वाजतादरम्यान ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, कार सोडून चालक पसार झाला. पोलिसांनी वाहनासह दोन लाख ८० हजार ६०० रूपयांचा माल जप्त केला.
लगतच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असल्याने या दोन्ही जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारुची तस्करी केली जाते.यासाठी दारुची तस्करी करणारे अर्जुनी मोरगाव मार्गाचा सर्वाधिक वापर करतात. याला प्रकाराला चाप बसावा याकरिता नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांनी कंबर कसली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीवरुन नवेगावबांध ते वडसा मार्गावरून देशी दारुची वाहतूक करणारी टाटा इंडिका जाणार असल्याची माहिती तोंदले यांना मिळाली. माहितीच्या आधारे त्यांनी बुधवारी (दि.१७) रात्री १० वाजतापासून ईटखेडा गावाजवळ नाकाबंदी करून पोलीस तैनात केले.नाकाबंदी असताना टाटा इंडिका क्रमांक एमएच ३४-एए ६६३४ आढळली असता पोलिसांनी चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा दिला.मात्र चालक भरधाव वेगात वाहन घेवून निघाला. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने इंडिका रस्त्यावरून उतरून शेतात शिरली व चालक पसार झाला.
पोलिसांनी वाहनात बघितले असता रॉकेट ब्रांडच्या १४ पेट्या ज्यामध्ये ९० मिमीचे एक हजार ४०० असा ३३ हजार ६०० रूपयांचा माल आढळला आला. याप्रकरणी पोलिसांनी ३३ हजार ६०० रूपयांची दारू व दोन लाख ५० हजार रूपये किंमतीची इंडिका असा एकूण दोन लाख ८० हजार ६०० रूपयांचा माल जप्त केला.अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी कलम ६५ (ई),७७ (अ) मुदाका सहकलम १३२, १७९ मोवाका अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांच्या मार्गदर्शनात नापोशि निरज ब्राम्हणकर, विजय कोटांगले, पोलीस शिपाई श्रीकांत मेश्राम, घनश्याम मुके यांनी केली.

Web Title: A smuggling vehicle seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.