शेतीपंपासाठी रोहित्रासकट वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:09 AM2018-09-16T00:09:07+5:302018-09-16T00:14:23+5:30

कमी दाबाने वीज मिळते ही समस्या कायमची निकाली निघणार आहे. सोबतच भंडारा व गोंदिया जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याला सौर कृषीपंपाद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, धानपिकासाठी जिल्हयातील शेततळ््यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे.

Rohitasakata power supply for agriculture | शेतीपंपासाठी रोहित्रासकट वीज पुरवठा

शेतीपंपासाठी रोहित्रासकट वीज पुरवठा

Next
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : जिल्ह्यातील शेततळ्यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कमी दाबाने वीज मिळते ही समस्या कायमची निकाली निघणार आहे. सोबतच भंडारा व गोंदिया जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याला सौर कृषीपंपाद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, धानपिकासाठी जिल्हयातील शेततळ््यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्हयातील शेती पंपासाठी अर्ज केलेल्या शेतकºयांच्या शेतात येत्या काळात रोहित्रासकट वीज जोडणी देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उर्जा, नवीन आणि नविकरणीय उर्जामंत्री उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
तिरोडा तालुक्यातील ग्राम पांजरा, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम महागाव, गोरेगाव तालुक्यातील ग्राम मोहाडी, गोंदिया तालुक्यातील ग्राम काटी या महावितरणच्या ५ उपकेंद्राच्या ई-लोकार्पण. तसेच मुंडीपार, ठाणेगाव, कोकणा, ठाणा, मुल्ला, तिरखेडी, रामनगर, रापेवाडा, गुमधावडा या ९ वीज उपकेंद्राच्या भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते. येथील गोरेगाव रोड मार्गावर आयोजीत कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी जिल्हयाचे पालकमंत्री राजकुमार बडोले होते. मंचावर आमदार गोपालदास अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार भैरसिंग नागपूरे , केशवराव मानकर, रमेश कुथे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ हमीद उपस्थित होते.
नामदार बडोले यांनी, एक शेतकरी एक रोहित्र ही योजना अतिशय उपयुक्त असून यामुळे शेतीला मोठया प्रमाणात लाभ होणार आहे. अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये पथदिवे व वीज सुविधा पुरविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने ८१० कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती दिली. प्रास्तावीक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर यांनी मांडले. संचालन श्रीमती मनिषा दुबे व कुमार कोकणे यांनी केले.
विद्युत सेवकांची हजेरी लवकरच
गोंदिया शहर परिसरातील विजेची समस्या दुर करण्यासाठी २८ कोटी रूपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. यात आणखी १८ कोटी रूपयांची कामे करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला असून याला लवकरच प्रशासकीय मान्यता देणार असल्याचे नामदार बावनकुळे यांनी सांगीतले. ग्रामीण भागात वीज पुरवठा बंद झाल्यावर तो सुरळीत करण्यासाठी बराच कालावधी लागतो. यावर उपाय म्हणुन जिल्हयातील ४८६ ग्रामपंचायतींमध्ये ग्राम विद्युत सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्हयातील २२२ ग्रामपंचायतींनी ठराव पारीत करून उमेदवारांची नावे महावितरणकडे पाठवली आहेत. लवकरच हे ग्रामविद्युत सेवक हजर होतील अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Rohitasakata power supply for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.