खड्ड्यांच्या दुरूस्तीसाठी देणार निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 09:57 PM2017-11-20T21:57:38+5:302017-11-20T21:58:38+5:30

जिल्ह्यातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांची दुरूस्ती १५ करा. खड्डयांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी व वाहतूक करणाऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Pothole repairs fund | खड्ड्यांच्या दुरूस्तीसाठी देणार निधी

खड्ड्यांच्या दुरूस्तीसाठी देणार निधी

Next
ठळक मुद्देचंद्रकांत पाटील : आढावा बैठकीत अभियंत्यासोबत साधला संवाद

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : जिल्ह्यातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांची दुरूस्ती १५ करा. खड्डयांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी व वाहतूक करणाºयांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील रस्त्यांच्या खड्डयांंच्या दुरूस्तीचे कामे करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात रविवारी (दि.१९) नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेताना ते बोलत होते.
या वेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार गोपालदास अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव एफ. एस. मेश्राम, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधिक्षक अभियंता प्रशांत नवघरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धोरणातून येत्या ६ महिन्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात येतील. सार्वजनिक बांधकाम विभागातील अनुकंपाची भरती लवकरच करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. खड्डे भरण्याच्या पलिकडचे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करुन मंत्रालयात पाठवावे.
विशेष कार्यकारी अधिकारी व मंत्रालयातील संबंधित यांच्याशी समन्वय साधून ही कामे गतीने करण्याचे निर्देश दिले. विभागीय पातळीवर विशिष्ट रक्कमेच्या कामाचे अधिकार देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून पाटील म्हणाले, राज्यातील स्थापत्य क्षेत्रातील अभियंत्यांचा एकमेकांशी संवाद साधणे आवश्यक असून त्यामधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विकासाला दिशा मिळण्यास मदत होईल.
रस्ते कोणतेही असले तरी त्या रस्त्यावरील खड्डे भरले गेले पाहिजे. अभियंत्यांनी काम करताना जीव ओतून काम करावे. तसेच कामे करताना सामाजिक बांधिलकी देखील जोपासावी असे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यातून जे राष्ट्रीय महामार्ग जातात त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. काही महामार्गावर खड्डे पडले असून रस्ते खराब झाले आहे. या रस्त्यांच्या साईडिंग व्यवस्थित भरण्यात न आल्यामुळे अशा ठिकाणी अपघाताची शक्यता नाकाता येत नाही.या ठिकाणांची तातडीने राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुरूस्ती करावी असे सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभाग क्र .१ च्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांनी सादरीकरणातून कामाची माहिती दिली. १७३ कि.मी. लांबीची ११ कामे ५०५४ याअंतर्गत करण्यात येणार आहे. मागील तीन वर्षात पूर्ण करण्यात आलेल्या पुलांच्या, इमारतीच्या बांधकामाची तसेच प्रगतीपथावर असलेल्या कामाची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभाग क्र .२ चे कार्यकारी अभियंता हेमंत गाणार यांनी आपल्या सादरीकरणातून माहिती देताना अड्याळ-दिघोरी- बोंडगाव-नवेगावबांध ते चिचगड रस्त्याचे काम केंद्रीय मार्ग निधीतून ९० टक्के पूर्ण झाले आहे. द्विवार्षिक रस्ते दुरु स्तीची कामे व कामाच्या प्रगतीबाबत तसेच रिक्त पदांबाबतची माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांनी उपस्थित काही अधिकाºयांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.

 

Web Title: Pothole repairs fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.