सकारात्मक पत्रकारितेतून सामान्यांना न्याय मिळतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:30 PM2019-01-13T22:30:38+5:302019-01-13T22:31:18+5:30

पत्रकार शासन व जनतेचा दुवा आहे. सत्यता बाळगुण गरीब व गरजुंना न्याय मिळवून देणे तसेच शासकीय योजना घराघरात पोहोचविण्याचे कार्य पत्रकारांमुळे शक्य झाले आहे. प्रिंट मिडियाचे महत्व आजअमर आहे. त्यात सकारात्मक पत्रकारीतेतून सामान्यांना न्याय मिळतो असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड यांनी केले.

In positive journalism, people get justice | सकारात्मक पत्रकारितेतून सामान्यांना न्याय मिळतो

सकारात्मक पत्रकारितेतून सामान्यांना न्याय मिळतो

Next
ठळक मुद्देरवींद्र राठोड : पत्रकार दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : पत्रकार शासन व जनतेचा दुवा आहे. सत्यता बाळगुण गरीब व गरजुंना न्याय मिळवून देणे तसेच शासकीय योजना घराघरात पोहोचविण्याचे कार्य पत्रकारांमुळे शक्य झाले आहे. प्रिंट मिडियाचे महत्व आजअमर आहे. त्यात सकारात्मक पत्रकारीतेतून सामान्यांना न्याय मिळतो असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड यांनी केले.
तालुका पत्रकार संघाच्यावतीने लक्ष्मणराव मानकर इन्स्टीट्यूट आॅफ फार्मसी येथे रविवारी (दि.६) पत्रकार दिवसानिमित्त आयोजीत कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वरिष्ठ पत्रकार जगदीश शर्मा होते. उद्घाटन संपादक एच.एच. पारधी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार शिशुपाल पवार, प्राचार्य डॉ. डी.के. संघी, तालुका कृषी अधिकारी लाखन बंसोड, समाज सेविका कविता रहांगडाले, पत्रकार संघाचे अध्यक्ष इसुलाल भालेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करुन बालशास्त्री जांभेकर, लक्ष्मणराव मानकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली.
याप्रसंगी डॉ. संघी यांनी, पत्रकारांनी एक छत्री व्यासपीठावर येवून अनेक गरजुंच्या समस्यांचे निवारण करावे. लेखणीतून सरकार बदलते म्हणून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी असे मत व्यक्त केले.
पारधी यांनी, पत्रकार समाजाचा आरसा आहे. आज आणि काल यातील पत्रकारीतेत आवाहने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत सत्याचे खंजर उचलून शोशितांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. पवार यांनी, ग्रामीण पत्रकार परीसरातील समस्या मंत्रालयात पोहोचविण्याचे कार्य करतो.
वेळोवेळी शासन योजनांचा लाभ गोरगरीबांना मिळाला की नाही याचा पाठपुरावा करतो. म्हणूनच पत्रकार व प्रशासनाचे बंधुभावाचे संबंध आहेत, असे मत व्यक्त केले. तर शर्मा यांनी, सामान्य माणसांच्या प्रश्नांचा आवाज उठवणारे व्यासपिठ असायला हवे. विश्वासार्हता आपल्या हातात आहे ती गमावू नये, असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक भालेकर यांनी मांडले. संचालन प्रा. झेड.एस. बोरकर यांनी केले. आभार राजीव फुंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुनील क्षिरसागर, सुनील पडोळे, यशवंत मानकर, आनंद शर्मा, विकास शर्मा, पालकराम वालदे, रितेश अग्रवाल, नरेंद्र कावळे, मेहश मेश्राम, दिनेश शेंडे, अजय खेतान, रेखलाल टेंभरे, राधाकिसन चुटे, प्रा. डी.एस. टेंभुर्णे, मुरलीधर करंडे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे संतोष कटकवार, तुलाराम कावळे, रिनाईत, संतोष (लल्लू) गुप्ता, रंजित मेश्राम, गोलू अग्रवाल आदींनी सहकार्य केले.

Web Title: In positive journalism, people get justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.