डुग्गीपार बिटातील सागवान वृक्षांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 08:55 PM2018-02-18T20:55:51+5:302018-02-18T20:56:34+5:30

सडक-अर्जुनी तालुक्यातील जंगलातील वृक्षांची कत्तल होणे, आता नित्याचीच बाब झाली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सडक-अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या डुग्गीपार बिटाअंतर्गत

Pirate | डुग्गीपार बिटातील सागवान वृक्षांची चोरी

डुग्गीपार बिटातील सागवान वृक्षांची चोरी

Next
ठळक मुद्देदोन महिन्यातील दुसरी घटना : गस्तीवर प्रश्नचिन्ह

राजेश मुनीश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : सडक-अर्जुनी तालुक्यातील जंगलातील वृक्षांची कत्तल होणे, आता नित्याचीच बाब झाली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सडक-अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या डुग्गीपार बिटाअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -६ वरील शशीकरण पहाडी जवळील जंगलातून दोन महिन्यापूर्वी दोन वृक्षाची कत्तल करुन परस्पर विल्हेवाट लावण्यात आली होती. या प्रकाराची चौकशी सुरू असताना बिट क्रमांक ५५५ मधील सहा सागवान झाडांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार रविवारी (दि.१८) सकाळी उघडकीस आला. या बिट क्रमांकापासून वनरक्षकाचे निवासस्थान केवळ अर्ध्या कि.मी.अंतरावर आहे. तालुक्यातील कोहमारा-बाम्हणी/खडकी, पुतळी-शेंडा, डव्वा-दोडके/जांभडी, सौंदड-पांढरी-कोसमतोंडी या मार्गावर रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आह. मात्र गस्तीच्या नावावर झोपा काढण्याच्या प्रकारामुळे जंगलातून मौल्यवान वनसंपतीची लूट होत असल्याचे चित्र आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वन बिट क्रमांक ५५५ या ठिकाणावरुन दोन महिन्यात दोन वेळा सागवान वृक्षांची कटाई करुन नेल्याच्या घटना घडल्या. ही गंभीर बाब आहे. वनकर्मचारी यांनी रात्रीची गस्त वाढवून वन तस्कारांचा शोध घेण्याची गरज आहे. याच परिसरात वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याची चर्चा आहे. संबंधीत वनरक्षकावर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे. वन परिक्षेत्र अधिकारी राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
फिरत्या पथकावर प्रश्नचिन्ह
या परिसरातील जंगलातून सागवानाच्या वृक्षांची तस्करी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वनविभागाच्या जिल्ह्यातील फिरत्या पथकावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात जंगलाकडे लक्ष नसल्याचे चित्र आहे. केवळ प्रवास भत्याची दिनदर्शीका मात्र बरोबर लिहिली जात असल्याची चर्चा आहे. सदर अवैध वृक्ष चोरीची माहिती त्या फिरेपथक अधिकाºयांना नसल्याचे याच विभागातील एका जबाबदार अधिकाºयांनी सांगितले.
२८ हजार हेक्टरवरील वनसंपदा धोक्यात
सडक-अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत शेंडा, कोहमारा, सौंदड कोसमतोंडी, जांभळी/दोडके, रेंगेपार या ठिकाणी क्षेत्र सहाय्यकाचे कार्यालय आहे. सडक- अर्जुनी तालुक्यात शेंडा, कोसमतोंडी, सौंदड, जांभळी/दोडके, रेंगेपार या क्षेत्रात घनदाट जंगले आहेत. २८ हजार हेक्टर आर क्षेत्र जंगल व्याप्त आहे. येणाऱ्या काळात सागवान चोरांचे प्रमाण वाढल्यास मौल्यवान सागवान वृक्ष नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही, हे विशेष.

Web Title: Pirate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल