One truck collided with a truck in Gondia, the death of one | गोंदियात ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

गोंदिया- भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आमगाव- गोंदिया मार्गावर दहेगाव जवळ घडली. दौलतजी चव्हाण रा.हनुमाननगर, अदासी असे अपघात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.

शनिवारी रात्री सालेकसा धानोलीवरून तेराव्यावरून घरी परत येत असताना दहेगाव जवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या स्प्लेंडर गाडीला धडक दिली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी आमगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी चालकाला अटक केली आहे.