ओबीसींचे ‘चक्का जाम’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:11 PM2018-06-25T22:11:48+5:302018-06-25T22:12:04+5:30

मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या केंद्रीय कोट्यात ओबीसी विद्यार्थ्यांना २७ ऐवजी केवळ दोन टक्के आरक्षण देण्यात आले. त्यामुळे ओबीसी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे.

OBC's 'Chakka Jam' movement | ओबीसींचे ‘चक्का जाम’ आंदोलन

ओबीसींचे ‘चक्का जाम’ आंदोलन

Next
ठळक मुद्देजयस्तंभ चौकात रास्ता रोको : मुख्य मार्गावरील वाहतूक तासभर प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या केंद्रीय कोट्यात ओबीसी विद्यार्थ्यांना २७ ऐवजी केवळ दोन टक्के आरक्षण देण्यात आले. त्यामुळे ओबीसी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे. सोमवारी (दि.२५) शासनाच्या आरक्षणविरोधी धोरणाच्या विरोधात गोंदियाच्या जयस्तंभ चौकात ओबीसी संघर्ष कृती समितीद्वारे धरणे आंदोलन अचानक चक्काजाम आंदोलनात परिवर्तीत झाले. त्यामुळे या मार्गावरील जवळपास तासभरापर्यंत वाहतूक प्रभावित झाली.
दरम्यान गोंदिया शहर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करण्यासाठी पोलीस व्हॅन बोलावले. परंतु आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने असल्याने पोलीस व्हॅनमध्ये त्यांना घेवून जाऊ शकले नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी स्वत:हून पोलीस ठाण्यात जावून आपल्याला अटक करवून घेतली.
केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समितीच्या वतीने देशात वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा घेण्यात आली. यानंतर उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षेत आरक्षणाच्या धोरणाचे पालन न करता ओबीसींना ५ हजार २१८ ऐवजी केवळ ७४ जागा देण्यात आल्या. २७ टक्के आरक्षण न ठेवता केवळ दोन टक्के आरक्षण ठेवून शासनाने न्यायालयाच्या आदेशाचे सुद्धा अवमान केला आहे. या प्रवेश परीक्षेत आरक्षण पूर्ववत करून पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून ओबीसी संघर्ष कृती समितीने केली होती.
गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा संघटनांनी प्रधानमंत्री व केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्या नावे निवेदन पाठवून सदर मागणी केली होती. परंतु दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीने २५ जून रोजी गोंदियाच्या जयस्तंभ चौकातील आपल्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. सोमवारी सकाळपासून सुरू सदर धरणे आंदोलन सायंकाळी ४.३० वाजता अचानक चक्का जाम आंदोलनात परिवर्तीत झाला. त्यामुळे जयस्तंभ चौकात एकच धावपळ उडाली. संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जयस्तंभ चौकाचा मुख्य रस्ता जवळपास अर्धा ते पाऊण तासपर्यंत ठप्प झाली होती. त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती. दूरदूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आंदोलनकर्त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस व्हॅनमध्ये जागा कमी असल्यामुळे व आंदोलनकर्त्यांची संख्या अधिक असल्याने आंदोलनकर्त्यांनी स्वत: पोलीस ठाण्यात पोहचून अटक करवून घेतली.
धरणे व चक्काजाम आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, अमर वराडे, दीपक बहेकार, मुकेश शिवहरे, सावन कटरे, अर्जुन नागपुरे, राजीव ठकरेले, सविता बेदरकर, खेमेंद्र कटरे, सावन डोये, मनोज डोये, निलम हलमारे, बी.एम. करमकर, हौसलाल रहांगडाले, कमलबापू बहेकार, कैलाश भेलावे, मनोज मेंढे, मिलिंद गणवीर, विनोद हरिणखेडे, नितेश टेंभरे, पुष्पा खोटेले, विमल कटरे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

Web Title: OBC's 'Chakka Jam' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.