पोषाहार पुनवर्सन केंद्र कुलूप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:11 AM2018-10-24T00:11:39+5:302018-10-24T00:12:23+5:30

कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी एकीकडे शासनातर्फे विविध कार्यक्रम राबविले जात आहे. मात्र दुसरीकडे आरोग्य विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येत वाढ होत आहे.

Nutrient Replacement Center Locking Lock | पोषाहार पुनवर्सन केंद्र कुलूप बंद

पोषाहार पुनवर्सन केंद्र कुलूप बंद

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागाची डोळेझाक : जिल्ह्यात कुपोषणाची समस्या तीव्र

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी एकीकडे शासनातर्फे विविध कार्यक्रम राबविले जात आहे. मात्र दुसरीकडे आरोग्य विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येत वाढ होत आहे. कुपोषीत बालकांवर उपचार करण्यात येणाऱ्या येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील पोषाहार पुनवर्सन केंद्राला कुलूप लागले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गोंदिया जिल्हा हा आदिवासी बहुल आणि दुर्गम क्षेत्रात असल्याने जिल्ह्यात कुपोषणाची समस्या तीव्र आहे. जिल्ह्यातील १०३८ बालके कुपोषणाच्या श्रेणीत असून यापैकी २२८ बालके तीव्र कुपोषीत आहेत. आरोग्य विभागातर्फे तालुका पातळीवर कुपोषीत बालकांचा शोध घेवून त्यांच्यावर औषधोपचार केले जाते. यासाठी येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात पोषाहार पुनवर्सन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, आहार तज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाभरातील कुपोषित बालकांना या केंद्रात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करुन कुपोषण दूर केले जाते. मात्र सध्या स्थितीत या केंद्राकडे जिल्हा आरोग्य विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मागील तीन चार दिवसांपासून या पोषाहार पुनवर्सन केंद्राला कुलूप लागले असून येथे एकही कुपोषीत बालक दाखल नव्हते.
विशेष म्हणजे मागील तीन चार महिन्यापासून या केंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि परिचारीका यांची पदे सुध्दा रिक्त आहे. त्यामुळे केवळ आहार तज्ञाच्या भरोश्यावर हे केंद्र सुरु होते. या केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावी यासाठी जि.प.आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्यापही त्यावर तोडगा काढण्यात आला नाही.
त्यामुळे तेव्हापासूनच हे पोषाहार पुनवर्सन केंद्र वाºयावर सुरू आहे. आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास केंद्राच्या माध्यमातून कुपोषण निर्मुलनासाठी व्यापक प्रयत्न सुरु असल्याचा दावा केला जात आहे. मात्र दुसरीकडे पोषाहार पुनवर्सन केंद्र कुलूप बंद असल्याने जिल्ह्यात कुपोषण निवारण मोहीमेचे बारा वाजल्याचे चित्र आहे.
दरम्यान पोषाहार केंद्राला कुलूप लागले असल्याबाबत येथील कर्मचाºयांना विचारणा केली असता त्यांनी सध्या नवरात्रोत्सव सुरु असल्याने एकही बालक दाखल नसल्याचे सांगितले.
सीईओंचे आश्वासन हवेत
यापूर्वी सुध्दा लोकमतने बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील पोषाहार पुनवर्सन केंद्राच्या समस्येकडे आरोग्य विभागाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी एम.राजा.दयानिधी यांनी तातडीने बैठक घेवून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना याकडे लक्ष देवून सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. तसेच आपण स्वत: नियमित या केंद्राला भेट पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मागील आठवडाभरापासून या केंद्राची अवस्था पुन्हा जैसे थे झाली आहे.त्यामुळे सीईओंचे आश्वासन देखील हवेत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यातील कुपोषीत बालकांचा आकडा १०३८ वर पोहचला आहे. तर दुसरीकडे जिल्हा आरोग्य विभागाकडून कुपोषण निवारणासाठी जनजागृती केली जात नसल्याची ओरड आहे. विशेष म्हणजे याच विभागाचे काही अधिकारी याला दुजोरा देत आहे.

Web Title: Nutrient Replacement Center Locking Lock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य