ठळक मुद्देरांगेतील मृतांना ५० लाख रूपये द्या : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रपतीना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या नोट बंदी व लागू करण्यात आलेल्या जीएसटीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध दशर्विला. तसेच नोटबंदीदरम्यान रांगेत लागून मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रूपये देण्याची मागणी करीत उपविभागीय अधिकाºयांमार्फत राष्ट्रपतीने निवेदन पाठविण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सभा शुक्रवारी पक्ष कार्यालयात शहर अध्यक्ष अशोक सहारे यांच्या अध्यक्षतेत पार पडली.
याप्रसंगी मोदी सरकारने केलेली नोटबंदी व जीएसटीचा विरोध दर्शविण्यात आला. तसेच नोटबंद दरम्यान रांगेत लागल्याने मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रूपये तसेच बेरोजगारांना ५ लाख रूपये देण्याची मागणी करण्यात आली.
या मागण्यांचे निवेदन उप विभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्या मार्फत राष्ट्रपतीने पाठविण्यात आले.
निवेदन देताना राजकुमार जैन, साजनदास वाधवानी, राजेश दवे, खालीद पठाण, नानू मुदलीयार, विनायक शर्मा, छोटी पंचबुद्धे, अजीत देशमुख, त्रिलोक तूरकर, एकनाथ वहिले, निजाम शेख, पंकज पटले, सोनू येडे, हरजीत सिंग, रौनक ठाकूर, निलेश बहेकार, विवेक शिवणकर, सौरभ मिश्रा, दानेश बोरकर, सौरभ रोकडे, वामन गेडाम, चंद्रकुमार चुटे, रमेंद्र कुमार, रमन उके, संदीप पटले, विजय खोटेले, महेश शर्मा यांच्यासह अन्य पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
जास्तीत जास्त युवांना सदस्य बनवा
राष्ट्रवादी कॉंग्रसचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या सभेत त्यांनी सदस्यता अभियानावर चर्चा करीत जास्तीत जास्त युवांना सदस्य बनविण्याचे आवाहन केले.