अहंकार आणि मग्रूरीमुळेच नाना पटोलेंच्या राजकारणाचा अंत - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 10:40 PM2018-05-21T22:40:21+5:302018-05-21T22:40:21+5:30

अहंकार व मंग्रूरीमुळेच नाना पटोले यांच्या राजकारणाचा अंत होणार असून प्रफुल पटेल यांना पराजित करण्यासाठी भाजपात आलेले पटोले आता पटेलांचा झेंडा घेऊन लोकांकडे जात आहेत, अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

Nitin Gadkari News | अहंकार आणि मग्रूरीमुळेच नाना पटोलेंच्या राजकारणाचा अंत - नितीन गडकरी

अहंकार आणि मग्रूरीमुळेच नाना पटोलेंच्या राजकारणाचा अंत - नितीन गडकरी

Next

 गोंदिया - अहंकार व मंग्रूरीमुळेच नाना पटोले यांच्या राजकारणाचा अंत होणार असून प्रफुल पटेल यांना पराजित करण्यासाठी भाजपात आलेले पटोले आता पटेलांचा झेंडा घेऊन लोकांकडे जात आहेत, अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे भाजपा उमेदवार हेमंत (तानूभाऊ) पटले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे समाजिक न्याय मंत्री व पालकमंत्री राजकुमार बड़ोले,राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,आ. संजय पुराम, माजी खासदार खुशाल बोपचे,माजी आ. केशवराव मानकर, माजी आमदार खोमेश रहांगडाले,विनोद अग्रवाल, रचना गहाने, अल्ताफ हामिद, भावना कदम, अरविंद शिवणकर,गिरधर हत्तीमारे, वीरेंद्र अंजनकर, विजय बिसेन, उमाकांत ढेगे व अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्यामुळेच भंडारा गोंदियात भाजप टिकून आहे, असा नाना पटोलेचा समज होता. पण ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. कुणाच्या मालकीची नाही. कार्यकर्तेच या पक्षाचे मालक आहेत, असे सांगून गडकरी म्हणाले- प्रतिकूल परिस्थितीत कार्यकर्त्यांनी अपमान, पराभव सहन केला. श्यामबापू कापगते, लक्ष्मणराव मानकर, यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत या भागात पक्ष वाढवला. जनसंघाच्या काळात दिवा तेवत ठेवला. त्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभी झालेली पार्टी आहे. विचारधारेवर चालणारी ही पार्टी असल्याचेही गडकरी म्हणाले.
भय, भूक, आतंक आणि बेरोजगारी या देशाच्या समस्या आहे. या समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत.  60 वर्षे काँग्रेसने या देशावर राज्य केले. पण या समस्या कायम ठेवल्या. स्वत:चा मात्र काँग्रेस नेत्यांनी विकास करून घेतल्याची टीका करताना गडकरी म्हणाले- राहुल गांधी पंतप्रधान मोदींनी हिशेब विचारतात. पण आम्ही फक्त 4 वर्षापासून आहोत. 60 वर्षे या देशावर ज्यांनी राज्य केले, त्यांनी आधी हिशेब द्यावा असे सांगताना गडकरी म्हणाले- शेतीत परिवर्तन झाले तर देशात परिवर्तन होणार आहे. शेतकर्‍याचा विकास करण्यास मोदी सरकारचे प्राधान्य आहे. तसेच भंडारा गोंदिया याभागातील रस्ते आणि पुलाच्या कामांसाठी 8 हजार कोटी रुपये आपण दिले असून येत्या 3 महिन्यात 90 टक्के कामे सुरु होतील, असे गडकरी यांनी यांनी सांगितले.  सामाजिक न्याय मंत्री राजकुुमार बडोले यांनी विकासाची नवीन पहाट राज्य आणि केंद्र शासनामुळे या राज्यात सुरु झाली आहे. शेतकर्‍यांचा विकास व सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन हेच आमचे ध्येय असल्याचेही बडोले म्हणाले.

Web Title: Nitin Gadkari News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.