वृक्षांची सर्रास कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:13 AM2018-01-18T00:13:54+5:302018-01-18T00:14:10+5:30

राज्य व केंद्र सरकार पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करण्याचा मानस हाती घेवून कोट्यवधींचा निधी खर्च करून विविध योजनांमधून वृक्षांची लागवड करतो.

The most common slaughter of trees | वृक्षांची सर्रास कत्तल

वृक्षांची सर्रास कत्तल

googlenewsNext
ठळक मुद्देसा.बां. विभागाच्या रस्त्याच्या कडेला : तिरोडा-खैरलांजी मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : राज्य व केंद्र सरकार पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करण्याचा मानस हाती घेवून कोट्यवधींचा निधी खर्च करून विविध योजनांमधून वृक्षांची लागवड करतो. पण तिरोडा तालुक्यात सर्रास रस्त्याच्या कडेला झाडांची कत्तल होत आहे. या बाबीला प्रशासन जबाबदार आहे का? अशी जनमानसात चर्चा आहे.
सविस्तर वृत्त असे की, तिरोडा-खैरलांजी राज्य मार्ग क्र. ३६० वरील इंदोरा येथील पेट्रोल पंपजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन जिवंत झाडांची विद्युत आरासंचने कत्तल करुन झाडांची विल्हेवाट केली. सदर घटना सोमवारी, १५ जानेवारीच्या मध्यरात्री घडली आहे.
शासकीय नियमाप्रमाणे रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांपासून रहदारीस अडथळा निर्माण होत असेल तर ती झाडे कापण्यासाठी रितसर परवानगी घेवून झाडांचा जाहीर लिलाव करावा लागतो. मात्र संबंधित विभागाला विचारणा केली असता कोणत्याही इसमाने रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने झाड तोडण्याची परवानगी घेतली नाही. अशी संबंधित विभागाकडून माहिती मिळाली. याचा अर्थ सदर वृक्षांची अज्ञात व्यक्तीने चोरी केली असावी.
तसेच आजूबाजूला असलेल्या वनविभाग परिसरातही झाडांची कत्तल होत आहे. या बाबीवर वन विभागाच्या कर्मचाºयांनी लक्ष पुरवून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सदर प्रकरणाची तक्रार संबंधित विभागाने दवनीवाडा पोलीस ठाण्यात केली आहे. आता चोरट्यांवर कोणती कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कडेला झालेल्या झाडांची कत्तल म्हणजेच शासकीय मालमत्तेची अफरातफर करणे आहे. जर दोषींवर कारवाई झाली नाही तर चोरींचे प्रमाण वाढेल. शासकीय मालमत्तेची मोठी नासधूस होईल. पोलीस प्रशासन व संबंधित विभागाने यांनी सखोल चौकशी करुन दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
-एस.बी. शाहू
उपविभागीय अभियंता, सा.बां. विभाग, तिरोडा

Web Title: The most common slaughter of trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.