शिक्षकांसाठी चिमुकल्यांची शासनाकडे आर्त हाक, ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 01:51 PM2019-07-22T13:51:30+5:302019-07-22T14:03:12+5:30

जिल्हा परिषद शाळा मोरगाव येथील एक ते आठचे चिमुकले 186 विद्यार्थी अर्जुनी मोरगाव पंचायत समितीवर आज(२२) धडकले.

Morgaon school students protested against panchyat samiti | शिक्षकांसाठी चिमुकल्यांची शासनाकडे आर्त हाक, ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

शिक्षकांसाठी चिमुकल्यांची शासनाकडे आर्त हाक, ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

Next

अर्जुनी मोरगाव-  "शिक्षण आमचा अधिकार आहे , आम्हाला शिक्षक द्या, आम्हाला शिक्षक मिळालंच पाहिजे," ही आर्त हाक देत जिल्हा परिषद शाळा मोरगाव येथील एक ते आठचे चिमुकले 186 विद्यार्थी अर्जुनी मोरगाव पंचायत समितीवर आज(२२) धडकले. विद्यार्थ्यांनी जवळपास तीन किलोमीटरचे अंतर पायदळ पार करीत भर उन्हात निषेध मोर्चा काढला.
 मोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तीन वर्षांपासून वर्गखोली व शिक्षकांची मागणी प्रलंबित आहे. शिक्षणाच्या कायद्याच्या अंतर्गत प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार मिळाला. उत्तम विद्यार्थी घडविण्यासाठी मूलभूत सुविधा आवश्यक असतात. यात पूर्ण वेळ शिक्षक व सुंदर वर्गखोली, स्वच्छ परिसर यांचा समावेश होतो. पण शिक्षक व वर्गखोलीच नसणार तर विद्यार्थी विद्यार्जन कसे करायचं? हा गंभीर  विषय घेऊन तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरगाव येथील विद्यार्थ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून 2 शिक्षक व 2 वर्गखोलीच्या  प्रलंबित मागणीसाठी मोर्चा काढला, वारंवार पाठपुरावा करून ही लोकप्रतिनिधी व शासन दुर्लक्ष करीत असल्याने गावकरी व शाळा व्यवस्थापन समिती ने आज(22 ) शाळेला कुलुप ठोकून शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.

एक ते आठ वर्ग व 186 विद्यार्थी संख्या असणारी ही तालुक्यातील मोठी शाळा आहे. येथील जुन्या वर्गखोली पाडून 5 नवीन खोल्यांचे बांधकाम झाले. मात्र पुन्हा 2 खोल्याची गरज आहे, एक 1956 मधील जुनी इमारत आहे ती पडक्या अवस्थेत आहे. तिथे विद्यादानाचे काम शक्य नाही कारण कधीही दुर्घटना होण्याची शक्यता आहे. वर्गखोलीच्या कमतरतेमुळे एकाच वर्गात दोन तुकड्या बसवाव्या लागतात किंवा व्हरांड्यात वर्ग भरविले जाते. त्यामुळे गोंधळ होतो. आठ वर्गांसाठी  मुख्याध्यापकासह सहा शिक्षक असल्याने नेहमी तीन वर्ग वाऱ्यावर असतात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
यामध्ये एका खोलीत वर्ग 2 व3 , 5 व 7 आणि कार्यालयात 4था वर्ग बसविला जातो आणि दोन शिक्षकांची कमतरता असल्याने शिक्षकांची होणारी तारांबळ लक्षात येते. 186 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेला अल्प क्रीडांगणआहे, जे मिळाले आहे तिथे अतिक्रमण झाले असून ते शाळेपासून तीन किमी अंतरावर आहे. बाजूला पडके समाज मंदिर आहे, तिथे विद्यार्थ्यांसोबत दुर्घटना होऊ शकते. त्यालाही काटेरी कुंपण आहे ते पाडण्याची गरज आहे. या दुर्दैवी अवस्थेत ही जिल्हा परिषद शाळा आहे.
  एकीकडे खासगी शाळांना पूर्णवेळ शिक्षक मजबूत इमारती दिल्या जातात, मात्र जिथे गरिबांची मुले शिक्षण घेतात त्या शाळेत साधे चपराशी पद रिक्त असतो, अशी केविलवानी स्थिती सरकारी शाळांची आहे. आठ दिवसाआधी या मागण्यांचे निवेदन दिले होते, मात्र शासनाने काहीच कारवाई केली नाही. शेवटी आज शाळा व्यवस्थापन समितीने आक्रमक पवित्रा घेतला व शाळेला कुलूप ठोकले, पंचायत समिती समोर ठिय्या मांडला.

Web Title: Morgaon school students protested against panchyat samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.