शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ उभारणार स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 10:08 PM2018-08-02T22:08:50+5:302018-08-02T22:09:49+5:30

जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २३ पोलीस कर्मचारी आणि ३४ नागरिकांच्या स्मरणार्थ पोलीस विभागाच्या माध्यमातून स्मारक उभारण्यात येणार आहे. याची सुरूवात देवरी तालुक्यातील पिपरखारी येथून करण्यात आली.

Monument to commemorate martyr police personnel | शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ उभारणार स्मारक

शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ उभारणार स्मारक

Next
ठळक मुद्देदिलीप पाटील भुजबळ : वक्तृत्व व निबंध स्पर्धेतून जनजागृती, तीन वर्षांत विविध कामांवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २३ पोलीस कर्मचारी आणि ३४ नागरिकांच्या स्मरणार्थ पोलीस विभागाच्या माध्यमातून स्मारक उभारण्यात येणार आहे. याची सुरूवात देवरी तालुक्यातील पिपरखारी येथून करण्यात आली. या माध्यमातून नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा हा यामागील उद्देश असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी गुरूवारी (दि.२) पोलीस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील भुजबळ यांचे नुकतेच बुलढाणा येथे स्थानांतरण झाले. तर जिल्ह्यात २० ते २८ जुलै दरम्यान नक्षलविरोधी जनजागृती सप्ताह राबविण्यात आला. याची माहिती व त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. पाटील भुजबळ म्हणाले, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांच्या स्मृतींना उजाळा मिळावा, नक्षलवांद्याच्या कुट कारस्थानाची माहिती येणाºया भावी पिढीला मिळावी, यासाठी जिल्हा पोलीस विभागाच्या माध्यमातून एकूण ५७ स्मारके उभारण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध असून वर्षभरात सर्व स्मारकांचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल.
केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेत जावून दरवर्षी ३१ आॅक्टोबरला पोलीस विभागातर्फे माहिती देवून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली जात असल्याचे भुजबळ पाटील यांनी सांगितले. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने २० ते २८ जुलै दरम्यान जिल्ह्यात नक्षलविरोधी सप्ताह साजरा करण्यात आला. या अंतर्गत शालेय व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी नक्षलवाद लोकशाहीला विकासाला आव्हान या विषयावर निबंध व वर्क्तृत्व स्पधार् घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील तीन हजारावर विद्यार्थी सहभागी झाले होते. तर आदिवासी बहुल व दुर्गम भागात आयोजित आरोग्य शिबिराचा ४ हजार ५०० नागरिकांनी लाभ घेतल्याचे सांगितले.
पोलीस वसाहतीसाठी प्रथमच सर्वाधिक निधी
जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा आणि पोलीस स्टेशन इमारत बांधकामाचा मुद्दा मागील अनेक वर्षांपासून प्रलबिंत होता. मात्र आ.गोपालदास अग्रवाल यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा पोलीस प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याला यंदा प्रथमच १४० कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यामुळेच कर्मचारी वसाहत आणि पोलीस स्टेशन इमारतीचा प्रश्न मार्गी लागल्याचे पाटील भुजबळ यांनी सांगितले.
वाहतूक पथदिवे लवकरच
शहरातील जडवाहतूक आता बायपास मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी टी पार्इंट चौक, जयस्तंभ चौक, जि.प.कार्यालय चौक या परिसरात वाहतूक पथदिवे लावण्यात येणार आहे. लवकरच हे काम सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: Monument to commemorate martyr police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.