बाराभाटी धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:01 AM2018-12-22T01:01:19+5:302018-12-22T01:01:55+5:30

येथील आदिवासी विविध सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावरील अनागोंदी कारभार पुढे आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार ४० किलो ६०० ग्रॅम प्रती धानाचा कट्टा घेण्याचे निर्देश आहेत. मात्र या केंद्रावर चक्क ४५ ते ४६ किलो प्रती कट्टयाप्रमाणे धान खरेदी करताना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडले.

Misguided farmers at Barabhatti Paddy purchase center | बाराभाटी धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिशाभूल

बाराभाटी धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिशाभूल

Next
ठळक मुद्देनियमानुसार मोजमाप नाही : अधिकाºयांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : येथील आदिवासी विविध सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावरील अनागोंदी कारभार पुढे आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार ४० किलो ६०० ग्रॅम प्रती धानाचा कट्टा घेण्याचे निर्देश आहेत. मात्र या केंद्रावर चक्क ४५ ते ४६ किलो प्रती कट्टयाप्रमाणे धान खरेदी करताना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडले. तसेच याची आदिवासी विकास महामंडळाकडे शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे.
गुरूवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास धान खरेदी केंद्रावर नरेंद्र मेश्राम व भोजराज मुंगमोडे यांचे धान मोजतांना प्रती कट्टयामागे चार ते पाच किलो धान अतिरिक्त घेतले जात असल्याचा प्रकार समोर आला. या वेळी केंद्र प्रमुख भुमेश्वर वाढई हे बाजुला आपल्या टेबलावर नोंदणीसाठी बसून होते.सदर प्रकाराची तक्रार उपप्रादेशिक व्यवस्थापक राहुल पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. पाटील यांनी केंद्रावर येऊन मौका चौकशी केली. या दरम्यान ४५-४६ किलो प्रती किलो वजनाचे धानाचे कट्टे आढळले. त्यानंतर त्यांनी ५० ते ६० कट्टयांचे वजन करुन पाहिले असता त्या सर्व कट्टयांचे वजन अधीक आढळले. त्यानंतर या खरेदीे केंद्रावरील अनागोंदी कारभार पुढे आला. पाटील यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन शेतकºयांना दिले. दरम्यान या प्रकाराकडे संस्था संचालकांचे दुर्लक्ष झाले आहे.
याप्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाही करण्याची मागणी वेदप्रकाश राठोड, लिलाधर ताराम, नरेंद्र मेश्राम, दिलवर रामटेके, भोजराज मुंगमोडे, राजू औरासे, परसराम माने, विजय नशिने, कृष्णा लंजे, धनराज कावळे, आनंदराव डोंगरवार, भागवत बेलखोडे, कैलास चांदेवार या शेतकºयांनी केली आहे.

मी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी केली असता शेतकºयांच्या तक्रारीत तथ्य आढळले. शेतकºयांकडून ४० किलो ६०० ग्रॅम वजनानग कट्टे घेण्याऐवजी ४५-४६ किलो प्रती कट्टा घेण्यात आला.याप्रकरणी दोषींवर निश्चित कारवाही करण्यात येईल.
- राहुल पाटील, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, नवेगावबांध.
हा प्रकार केंद्रावरील हमालांनी केला, परंतु या ठिकाणी संस्थेचा केंद्रप्रमुख हे हजर होते. ही संपूर्ण जबाबदारी केंद्र प्रमुखाची आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये, यासाठी निश्चित दोषीवर कारवाही केली जाईल.
- तुलाराम मारगाये, अध्यक्ष आदिवासी विविध सेवा, सहकारी संस्था, बाराभाटी.
मीे हमालांना नियमानुसार धानाचे वजन करण्यास सांगितले. त्यानंतर मी दुसºया शेतकºयांचे धान तपासणीसाठी गेलो त्या दरम्यान हा प्रकार घडला असावा.
- भुमेश्वर वाढई, केंद्रप्रमुख,आदिवासी विविध सेवा, सहकारी संस्था, बाराभाटी.

Web Title: Misguided farmers at Barabhatti Paddy purchase center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी