संचालक घेणार मेडिकलच्या अधिकाऱ्यांचा क्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:27 PM2018-05-23T22:27:22+5:302018-05-23T22:27:22+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे सुरू झाल्यानंतर सोयी सुविधा आणि इतर गोष्टींच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहे. त्यामुळे येथील समस्या आणि वादाचा मुद्दा मंत्रालयापर्यंत पोहचला. याच सर्व गोष्टींची चाचपणी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. टी. पी. लहाने हे गुरूवारी (दि.२४) गोंदिया येथे येणार आहे.

Medical Officer will take the presidency class | संचालक घेणार मेडिकलच्या अधिकाऱ्यांचा क्लास

संचालक घेणार मेडिकलच्या अधिकाऱ्यांचा क्लास

Next
ठळक मुद्देवैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक घेणार आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे सुरू झाल्यानंतर सोयी सुविधा आणि इतर गोष्टींच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहे. त्यामुळे येथील समस्या आणि वादाचा मुद्दा मंत्रालयापर्यंत पोहचला. याच सर्व गोष्टींची चाचपणी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. टी. पी. लहाने हे गुरूवारी (दि.२४) गोंदिया येथे येणार आहे. यादरम्यान ते वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाºयांचा क्लास घेणार असल्याची माहिती आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या तिसºया वर्षाची नुकतीच परवानगी मिळाली आहे. परंतु वैद्यकीय महाविद्यालय चालविण्यासाठी केटीएस जिल्हा रूग्णालय व बाई गंगाबाई महिला रूग्णालयाकडून त्यांच्या इमारतींचे हस्तांतरण करण्याचा जो करार करण्यात आला होता. तो तीन वर्षांचा करार १९ डिसेंबर २०१७ रोजी समाप्त होणार आहे.
या कराराचे नविनीकरण मंत्रालयाकडून अद्याप करण्यात आले नाही. अशात तिसºया वर्षाचे शिक्षण सुरू करण्याची परवानगी मिळण्याचे काय औचित्य आहे. यावर संचालकांना लोकप्रतिनिधींद्वारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण विभागाने कराराचा प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी मंत्रालयालाकडे पाठविला आहे.
चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावाला डिसेंबर महिन्याच्या आधीच मंजुरी देण्यात आली आहे. मग गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या करार पत्राला का मंजुरी देण्यात आली नाही. आदी प्रश्न संचालकांसमोर उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.
सक्तीने पाठविले रजेवर
वैद्यकीय महाविद्यालय गोंदियाच्या मेडीसिन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील व इतर दोन वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद खंडाईत व डॉ. शोभना डिटे यांना महाविद्यालय प्रशासनाने सक्तीने रजेवर पाठविले आहे. डॉ. पाटील यांनी याविरूद्ध आपल्या वकिलाच्या माध्यमातून एक नोटीस जिल्हा शल्य चिकित्सक, तत्कालीन डीन व प्रभारी डीनच्या नावांने पाठविली आहे. यावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाºयांनी सांगितले की, त्यांच्याविरूद्ध आलेल्या तक्रारीच्या आधारावर सदर कारवाई करण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर प्रकरणात अनेक अडथळे आहेत. यावर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांच्या दौºयातून मार्ग निघण्याची शक्यता आहे.

Web Title: Medical Officer will take the presidency class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.