मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रम आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:47 AM2019-02-09T00:47:20+5:302019-02-09T00:48:10+5:30

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाची गंगा आणणारे स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११३ व्या जयंती निमित्त शालेय व पदव्युत्तर अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण घेवून उर्तीण होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्व.मनोहरभाई पटेल सुवर्ण पदक वितरण कार्यक्रम शनिवारी (दि.९) सकाळी ११ वाजता स्थानिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रागंणावर आयोजित करण्यात आला आहे.

Manoharbhai Patel Jayanti Program Today | मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रम आज

मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रम आज

googlenewsNext
ठळक मुद्देकमलनाथ, संजय दत्त, अनिल अग्रवाल यांची उपस्थिती : सुवर्ण पदक वितरण समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाची गंगा आणणारे स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११३ व्या जयंती निमित्त शालेय व पदव्युत्तर अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण घेवून उर्तीण होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्व.मनोहरभाई पटेल सुवर्ण पदक वितरण कार्यक्रम शनिवारी (दि.९) सकाळी ११ वाजता स्थानिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रागंणावर आयोजित करण्यात आला आहे. या वेळी प्रमुख पाहुणे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, सिनेअभिनेता संजय दत्त, प्रसिध्द उद्योगपती वेदांना ग्रुपचे अनिल अग्रवाल व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रफुल्ल पटेल राहणार आहेत.
या वेळी मध्यप्रदेशचे खनिकर्म मंत्री प्रदीप जायस्वाल, मध्यप्रदेश विधानसभा उपाध्यक्ष हिना कावरे, खा. मधुकर कुकडे, अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री अनिल देशमुख, आ.गोपालदास अग्रवाल, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, नगराध्यक्ष अशोक इंगळे, भंडारा जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, नाना पंचबुध्दे, विलास श्रृंगारपवार, टामलाल सहारे, माजी खा. विश्वेश्वर भगत, आ. संजय उईके, माजी.आ.अनिल बावणकर, रामरतन राऊत, सेवक वाघाये, दिलीप बन्सोड, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, मनोहरभाई पटेल अ‍ॅकडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन उपस्थित राहणार आहेत.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोन्ही जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन गौरविन्यात येणार आहे. या वेळी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ, स्व.मनोहरभाई पटेल स्मृति समिती, मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीने कळविले आहे.

Web Title: Manoharbhai Patel Jayanti Program Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.