महालगाव येथे ‘त्या’ जागेवर महापरिनिर्वाण दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 08:44 PM2018-12-08T20:44:39+5:302018-12-08T20:46:24+5:30

अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून दोन समाजातील तेढ सावरुन गावात सामाजिक सलोखा निर्माण केला. यामुळे ग्राम महालगाव येथे डॉ. आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनी बौद्ध बांधवांनी शांततेत अभिवादन केले.

Mahaparinirvana celebrates the day at Mahagaongaon | महालगाव येथे ‘त्या’ जागेवर महापरिनिर्वाण दिन साजरा

महालगाव येथे ‘त्या’ जागेवर महापरिनिर्वाण दिन साजरा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून दोन समाजातील तेढ सावरुन गावात सामाजिक सलोखा निर्माण केला. यामुळे ग्राम महालगाव येथे डॉ. आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनी बौद्ध बांधवांनी शांततेत अभिवादन केले.
महालगाव येथे अनुसूचित जाती व जमातीचेच लोक राहतात. अनुसूचित बौद्ध बांधवासाठी दलीतवस्ती अंतर्गत बांधण्यात आलेल्या समाजमंदिरात भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत. सातबाऱ्यात अतिक्रमण नोंद म्हणून असलेल्या १० आर जागेत बौद्ध समाजाचा झेंडा असल्याचे नमूद आहे. तर दुसरीकडे अनुसूचित जमातीच्या आदिवासी समाज बांधवांसाठी गावात अन्य भागात त्यांचे श्रध्दास्थान असलेल्या वास्तु आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून गुण्यागोविंदाने नांदणारे अनुसूचित जाती जमाती समाज बांधवामध्ये मागील ३-४ वर्षापूर्वी समाज मंदिरात स्थापित झालेल्या भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला धरुन दोन समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण झाली.
वाद पराकोटीला गेला व काही गावकºयांवर कारवाई झाली. अनेकांना कोर्टाची पायरी चढावी लागली. गावाची शांतता भंगली व दोन्ही समाजाची मने दुरावली. अशात ठाणेदार शिवराम कुंभरे यांनी दोन्ही समाजातील तेढ दूरु सारुन आपसात सलोखा निर्माण करण्यासाठी दोन्ही समाजांची समजूत घालून गावात शांती निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तहसीलदार धनंजय देशमुख यांनी महापरिनिर्वाण दिन साजरा करण्याची अनुमती दिली. त्यानंतर बौद्ध समाजबांधवानी विवादित स्थळी डॉ. आंबेडकर यांचा महापरिनिर्वान दिन साजरा केला. निळा धम्मध्वज अर्ध्यावर उतरवून, सामुदायीक त्रिशरण, पंचशिल ग्रहण केली. डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलन व पुष्पहार घालून श्रध्दांजली अर्पण केली. ठाणेदार कुंभरे यावेळी परिस्थितीवर लक्ष ठेवून उपस्थित होते.

Web Title: Mahaparinirvana celebrates the day at Mahagaongaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस