खंगार यांचे मरणोपरांत नेत्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 09:49 PM2018-10-22T21:49:39+5:302018-10-22T21:49:55+5:30

शहरवासीयांमध्ये नेत्र आणि अवयवदानाबाबत जागृकता वाढत असून शहरवासीय नेत्रदानाप्रती अधिक डोळस होत असल्याचे चित्र आहे. येथील राजेंद्र खंगार यांचे काही दिवसांपूर्वीच अल्पशा आजाराने निधन झाले.

Khangar's posthumous donation | खंगार यांचे मरणोपरांत नेत्रदान

खंगार यांचे मरणोपरांत नेत्रदान

Next

गोंदिया : शहरवासीयांमध्ये नेत्र आणि अवयवदानाबाबत जागृकता वाढत असून शहरवासीय नेत्रदानाप्रती अधिक डोळस होत असल्याचे चित्र आहे. येथील राजेंद्र खंगार यांचे काही दिवसांपूर्वीच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी मरणोपरांत त्यांचे नेत्रदान केले. राजेंद्र खंगार यांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता. दरम्यान अल्पशा आजाराने त्यांचे नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.
यानंतर खंगार यांची पत्नी छाया खंगार यांनी पुढाकार घेत याची माहिती गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्रपिढीला दिली. त्यानंतर नेत्रपिढीच्या चमूने नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. खंगार यांच्या नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना सुंदर सृष्टी पाहता येणार आहे.
मागील आठवडाभराच्या कालावधीत शहरातीलन तीन व्यक्तींनी मरणोपरांत नेत्रदान केले. त्यामुळे गोंदिया जिल्हावासीयांमध्ये नेत्रदानाप्रती जागृकता निर्माण होत आहे.

Web Title: Khangar's posthumous donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.