भक्तीमय वातावरणात कावड यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:50 AM2017-07-25T00:50:28+5:302017-07-25T00:50:28+5:30

श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांनी भगवान शंकराची पूजा अर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील विविध शिव मंदिरात गर्दी केली होती.

Kavad Yatra in the devotional environment | भक्तीमय वातावरणात कावड यात्रा

भक्तीमय वातावरणात कावड यात्रा

Next

श्रावणातील पहिला सोमवार : भाविकांनी केली मंदिरात पूजा-अर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांनी भगवान शंकराची पूजा अर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील विविध शिव मंदिरात गर्दी केली होती. जल व दुधाने अभिषेक करुन इच्छापूर्तीसाठी मंगलकामना केली. कावड यात्रा काढून बम बम भोले, ओम नम:शिवायचा गजर केला. त्यामुळे भक्तीमय वातावरण तयार झाल्याचे चित्र होते.

श्रावण महिन्यानिमित्त भगवान शंकराच अभिषेक करण्यासाठी भक्तांतर्फे कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. स्थानिक संस्कार गृप युवा संघटनेने यासाठी पुढाकार घेतला होता. आमगाव नगरीत बम बम भोले, ओम नम: शिवाय या भक्ती गजराने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. संस्कार गृप या युवा संघटनेकडून वाघ नदी परिसरातून कावड यात्रेची सुरूवात झाली. कावड यात्रेत भक्तजन मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. कावड यात्रेनिमित्त जल सिंचन, शेत शिवारांना पाणी घालणे, राहणीमान परिसरात पशुपक्षी व पर्यावरणाला पाणी उपलब्ध करुन देणे असे संकल्प सोडत कावड यात्रेला भक्तांनी हजेरी लावली. कावड यात्रेने व्यक्तीमत्व विकास, संकल्प शक्ती आणि आत्मविश्वास वाढत असल्याचा समज देखील भाविकांनामध्ये आहे. गुणवत्ता व शक्तीची ओळख यातून पुढे येत शिव कृपेने प्रेरीत होण्याचे बळ निर्माण होत असल्याचे भाविक मानतात. कावड यात्रा नगरीत भ्रमण करीत शिव मंदिर महादेव पहाडी येथे शिव अभिषेक करण्यात आले.
कावड यात्रा सालेकसा मार्ग, कामठा चौक, गांधी चौक, मानकर गुरुजी चौक ते आंबेडकर चौक ते रिसामा येथे भ्रमण करीत महादेव पहाडी येथील शिवमंदिर परिसरात दाखल झाली. यावेळी नदीपत्रातून तांब्याच्या पात्रात आणलेल्या पाण्याने शिव अभिषेक करण्यात आला. अभिषेक पूजन, महाआरतीनंतर शिव भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

Web Title: Kavad Yatra in the devotional environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.