गुरुदासला ढोलकीने बनविले गुरु पेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:39 PM2017-11-24T22:39:59+5:302017-11-24T22:40:11+5:30

कला ही जन्मजात असते. व्यासंगाने ती अधिक वृद्धींगत होत जाते. कलाकार हा जन्मताच कलाकार असतो. तो निर्माण करता येत नाही, म्हणून कला ही नशेसारखी असते.

Guru Painter created by Gurudasas Dholaki | गुरुदासला ढोलकीने बनविले गुरु पेंटर

गुरुदासला ढोलकीने बनविले गुरु पेंटर

Next
ठळक मुद्देझाडपट्टीतील कलांवताचे नाव पोहोचले सर्वत्र : अनेकांना पाडली भुरळ

राजकुमार भगत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : कला ही जन्मजात असते. व्यासंगाने ती अधिक वृद्धींगत होत जाते. कलाकार हा जन्मताच कलाकार असतो. तो निर्माण करता येत नाही, म्हणून कला ही नशेसारखी असते. एकदा ती रक्तात भिनली की माणसाला कशाचेच भान नसते. कलेत हरवून जाणारा आपल्या कलेने रसिकांची मने तृप्त करणारा त्यांना भावविभोर करणार असाच एक कलावंत गोंदिया जिल्ह्यात आहे.
गुरुदास राऊत हे त्या कलावंताचे नाव. झाडीपट्टीतील उत्तम तबला वादक म्हणून त्यांची ओळख आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी हे त्यांचे मुळ गाव असून त्यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. त्यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. मात्र पोटाची खळगी भरणे आवश्यक होते.
गुरुदासला लहानपणापासून ढोलकी वाजविण्याचा छंद होता. म्हणून गुरुदासनी ढोलकी हेच आपले जीवन गाणे आहे असे समजून आयुष्याला नवा आयाम दिला. ढोलकीलाच साक्षी ठरवून त्यांनी त्याच्या जीवनाला प्रारंभ केला. सध्या ते वर्षभरात ६० ते ७० कार्यक्रम घेतात. यातून प्राप्त होणाºया उत्पन्नावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो. त्याच्या कर्तृत्व आणि गुण कौशल्यामुळेच गुरुदासला गुरु पेंटर बनविले. झाडीपट्टीत ढोलकी वादक म्हणून गुरुदास राऊत यांचे मोठे नावलौकीक आहे. ढोलकीच्या तालावार हे शब्द कानावर पडले की, वेगळ्याच बहारदार लावण्यांची आठवण होते. लावणी आणि ढोलकी हे एक समीकरण आहे. ढोलकी शिवाय लावणी नाही आणि लावणी शिवाय ढोलकीची रंगत येत नाही. या दोन्ही जोडी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गुरुदासच्या हाताची थाप पडली की नृत्यांगणेचे पैजन थिरकते. समजा मे संग नाटकाचे व्यासपीठ असो की लावण्याचे कार्यक्रम गुरुदास आणि ढोलकी वेगळे नाहीच. ढोलकीवर पडणारी थाप त्याचा जिवनाचा श्वास होईल, उदरनिर्वाहाचे साधन होईल, एक सुंदर जीवन गाणे होईल, असे कदापिही त्यांना वाटत नव्हते. पण हे अगदी सत्य आहे. गुरुदास म्हणतो ढोकली आणि ढोलकी म्हणजे गुरु पेंटर.
वयाच्या दहाव्या वर्षांपासून रमले संगीतात
वयाच्या १० वर्षापासूनच गुरुदास संगीतात रमला. एक दिवस झाडीपट्टीच्या रंगभूमिमध्ये एक कलाकार म्हणून नाव रुपाला येईल असे त्याला कधी वाटले नव्हते. त्यांने रसिकांची मने जिंकली. एक उकृष्ट तबला व ढोलकी वादक म्हणून त्याचे नावाची ख्याती आता दूरवर पोहचली आहे.
शासनाच्या विविध उपक्रमात सहभाग
शासनाच्या विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमात कलापथकात ते ढोलकीवादक म्हणून काम करतात. जलस्वराज प्रकल्प, हुंडाबळी, पहाट, एड्स, स्वच्छताविषयक अभियान या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरुदासने कलेचे प्रदर्शन केले आहे. त्यामुळे त्यांचे नाव आता संपूर्ण महाराष्टÑभर पोहचले आहे. झाडीपट्टीतील नाटके व हौसी नाटक कंपन्यामध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. यामुळेच ढोलकी किंवा तबला वादकासाठी त्यांची नेहमी मागणी असते. त्यांच्या ढोलकी व तबल्याच्या तालावर प्रेक्षक अरक्षश: बेधुंद होवून थिरकतात. हीच त्यांच्या कलेला मिळालेली दाद आहे. शास्त्रीय पद्धतीने संगीत साथ देणारा हा कलाकार अगदी आगळा वाटतो.

Web Title: Guru Painter created by Gurudasas Dholaki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.