‘गुडमॉर्निंग’ पथकाने वसूल केला सात लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:18 AM2019-01-24T00:18:35+5:302019-01-24T00:21:13+5:30

नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले. या पथकाने मागील दीड वर्षात जिल्हाभरात ५८३ फेऱ्या काढून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांकडून ७ लाख २ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

'Goodmaning' team recovers seven lakh fine | ‘गुडमॉर्निंग’ पथकाने वसूल केला सात लाखांचा दंड

‘गुडमॉर्निंग’ पथकाने वसूल केला सात लाखांचा दंड

Next
ठळक मुद्देदीड वर्षात पथकाच्या ५८३ फेऱ्या : नादुरूस्त असलेली ४३ हजार २४८ शौचालये झाली सज्ज

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले. या पथकाने मागील दीड वर्षात जिल्हाभरात ५८३ फेऱ्या काढून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांकडून ७ लाख २ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. यात सर्वात जास्त दंड तिरोडा तालुक्यातील लोकांना बसला आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात आलेला मोहिमेतून ग्रामीण व शहरी भागात घरोघरी शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. पण त्या शौचालयांचा वापर न करता गावकरी उघड्यावर शौच करीत होते. निर्मल ग्राम किंवा निर्मल जिल्हा करण्याच्या नादात जिल्ह्यात ओबड-धोबड शौचालय तयार करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ४४ हजार २२५ शौचालय नादुरूस्त होते. ते नादुरूस्त शौचालय दुरूस्त करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी लागत होता. परंतु तो निधी शासनाने देण्यास नकार दिल्यामुळे जिल्हा परिषदेने मागील दिड वर्षात केलेल्या जनजागृतीमुळे ४३ हजार २४८ शौचालय तयार करण्यात आले आहे.
नादुरूस्त असलेले शौचालय सुरू करण्यासाठी सर्वात मोठे प्रयत्न करून एवढे शौचालय सुरू करणारा गोंदिया जिल्हा राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिला जिल्हा आहे. ‘गुडमॉर्निंग’ पथकाच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील गावागावांत ५८३ फेऱ्या गुडमॉर्निंग पथकाने मारल्या. यासाठी तालुकास्तरावर १६ गट पाडण्यात आले होते. गुडमॉर्निंेग पथकाच्या जनजागृतीमुळे २१ हजार ३४७ शौचालय लोकांनी स्वयंस्फूर्तीने बांधले आहेत. शौचालयात न जाता उघड्यावर शौचास बसणाऱ्या लोकांना दंड ही करण्यात आला. पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत ‘गूडमॉर्निंग’ पथकातील अधिकारी, कर्मचारी व गावकऱ्यांनी पथकासह गावच्या वेशीवर जाऊन उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. इतकेच नव्हे तर गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी करण्यात आली. लोकांना शौचालयाचे महत्व पटवून त्यांना शौचालय बांधण्यासाठी बाध्य करण्यात आले.

गृहभेटीही ठरल्या प्रभावी
शौचालयाचा वापर न करणाºया किंवा ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा २३ हजार ६०८ लोकांच्या घरी स्वच्छ भारत अभियान राबविणाऱ्या लोकांनी भेटी दिल्या. एवढ्या घरांच्या भेटी ४६८ अधिकारी-कर्मचाºयांनी केल्या आहेत. या गृहभेटीची फलश्रृती म्हणजे १४ हजार ५६ लोकांनी आपल्या घरी शौचालय बांधले आहेत. यासाठी १६ ठिकाणी नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच ३१ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे १३१ शिबिर जिल्ह्यात घेण्यात आले. या शिबिरात ३१०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यांनीही शौचालय किती महत्वाचे आहे हे शिबिराच्या माध्यमातून लोकांना पटवून दिले.

१.८० लाख महिलांना वाणातून स्वच्छतेचा संदेश
गोंदिया जिल्ह्यातील लोकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी संक्रांतीच्या हळदीकुंकू व वाणातून १ लाख ८० हजार महिलांपर्यंत शौचालयाचे महत्व पोहचविण्यात आले. १ हजार ७९७ आंगणवाडीमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ही जनजागृती करण्यात आली. वाण म्हणून पतंजलीकडून १ लाख ७३ हजार साबण दिल्या. जिल्हा परिषद कडून वाण म्हणून सॅनिटरी पॅड देण्यात आले. हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरल्याचे जनमाणसात चर्चा आहे.

शौचालयासाठी लाभार्थ्यांना १२ हजार रूपये देऊन शौचालयाचे बांधकाम करणे अवघड नाही. मात्र नादुरूस्त शौचालय तयार करणे अत्यंत अवघड होते. त्या दृष्टीने विविध उपक्रम राबवून ते शौचालय तयार करण्याचे कार्य जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आले. विशेष म्हणजे, याची दखल केंद्रस्तरावर घेण्यात आली आहे.
-राजेश राठोड, उपमुख्य कार्यपालन अधिकारी, पाणी व स्वच्छता जि.प. गोंदिया.

Web Title: 'Goodmaning' team recovers seven lakh fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.