आदिवासींना विकासाच्या मार्गावर चालविणे हेच ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 09:29 PM2019-06-15T21:29:01+5:302019-06-15T21:29:26+5:30

गोंदिया जिल्हा नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन नसून गडचिरोली सारखाच संवेदनशिल जिल्हा आहे. गडचिरोलीत भूसुरूंगस्फोट घडवून पोलिसांचे वाहन उडविण्यात आले. असाच भूसुरूंगस्फोट गोंदियातही घडविण्याचे मनसुबे नक्षल्यांचे होते.परंतु ऐनवेळी पोलिसांच्या सर्तकेने गोंदियातील नक्षलवाद्यांचा कुटील डाव फसला आणि ती स्फोटके जप्त केलीत.

The goal of the tribal people to work on the path of development | आदिवासींना विकासाच्या मार्गावर चालविणे हेच ध्येय

आदिवासींना विकासाच्या मार्गावर चालविणे हेच ध्येय

Next
ठळक मुद्देशासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया जिल्हा नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन नसून गडचिरोली सारखाच संवेदनशिल जिल्हा आहे. गडचिरोलीत भूसुरूंगस्फोट घडवून पोलिसांचे वाहन उडविण्यात आले. असाच भूसुरूंगस्फोट गोंदियातही घडविण्याचे मनसुबे नक्षल्यांचे होते.परंतु ऐनवेळी पोलिसांच्या सर्तकेने गोंदियातील नक्षलवाद्यांचा कुटील डाव फसला आणि ती स्फोटके जप्त केलीत.
गोंदिया जिल्ह्याच्या आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अडीच महिन्यापूर्वी रूजू झालेले जालींदर नालकूल यांनी गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या आदिवासी जनता व पोलीस यांच्यात समन्वय साधण्यासाठी आदिवासींना विकासाच्या मार्गावर नेणाºया विकास योजनांचा लाभ मिळवून देण्याचा चंग बांधला. लोकमतने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी दिलखुलास चर्चा केली.
२०१४ ला पोलीस दलात रूजू झालेले जालींदर नालकूल यांची नाशिक येथे ट्रेनिंग झाली. पहिली पोस्टींग नागपूर ग्रामीण येथे परिवेक्षाधिन अधिकारी म्हणून एक वर्ष, त्यानंतर रायगड व आता आमगाव उपविभागाचे ते उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत. १५ मार्च २०१९ ला रूजू झालेले नालकूल यांनी नक्षलवाद्यांची मुसके आवळण्यासाठी त्यांना जेवण देणाºया आदिवासी जनतेला विश्वासात घेण्याचे काम सुरू केले.गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी जनता आधी पोलीसांना माहिती देत नव्हती. पोलीस गावात आले की लोक दार बंद करून घरात राहायचे. परंतु महाराष्टÑ शासनाने आणलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त मोहीमेमुळे आदिवासी जनता व पोलीस विभाग यांच्यात समन्वय साधला गेला. तंटामुक्त मोहीम ही पोलीस व नक्षलग्रस्त भागातील जनता यांच्या समन्वय साधणारा दुवा झाली. नालकूल म्हणाले विकासापासून जनता दूर असली की त्यांना विविध आमिष देऊन नक्षलवादी आपल्या चळवळीकडे वळवितात. त्यामुळे नक्षलवाद्यांना कुणीही सहकार्य करू नये यासाठी त्या जनतेला विकासाच्या समृध्द मार्गावर चालण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा थेट फायदा करून देण्यासाठी पोलीस विभाग तत्पर असल्याचे म्हणाले. निराधार, वृध्दांना, शेतकऱ्यांना व बेरोजगारांना विविध योजनांचा लाभ देऊन त्यांचा विकास करण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी काम करणार आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांना पोहचवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचा माणस बांधला आहे. नक्षलवाद्यांचा खडतर मार्ग जीवन उध्वस्त करणारा आहे.सद्यास्थितीत सगळे लोक प्रगतीच्या मार्गावर चालण्यासाठी नक्षल चळवळीत असणारे लोकही चळवळ सोेडून आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेत आहेत. लोकशाहीच्या मुख्यप्रवाहात येणाºयासाठी शासनाने नक्षल आत्मसमर्पण योजना अमंलात आणली. हिंसा करून काहीच साध्य होत नाही. आदिवासी जनतेने आपल्या समस्या, अडचणी यावर पोलिसांसमोर खुला संवाद करणेगरजेचे असल्याचे नालकूल म्हणाले. ‘झुंज करूणी का शिणता, रक्त पिपासू का बनता, असा आर्त सवाल करीत शांततेच्या आणि प्रगतीच्या मार्गावर चालण्यासाठी नक्षलवाद्यांनीही मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहनही त्यांनी मुलाखतीतून केले आहे.

Web Title: The goal of the tribal people to work on the path of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस