दारू वाहून नेणारी चारचाकी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 10:22 PM2019-05-07T22:22:40+5:302019-05-07T22:23:32+5:30

दारूबंदी असलेल्या शेजारच्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात गोंदिया जिह्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात आहे. यातच चारचाकी वाहनातून देशी दारू नेत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने चारचाकी वाहनाला पकडले.

The four-wheeler carrying liquor was caught | दारू वाहून नेणारी चारचाकी पकडली

दारू वाहून नेणारी चारचाकी पकडली

Next
ठळक मुद्देउत्पादन शुल्क विभागाची कारवाई : पाच लाखांचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दारूबंदी असलेल्या शेजारच्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात गोंदिया जिह्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात आहे. यातच चारचाकी वाहनातून देशी दारू नेत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने चारचाकी वाहनाला पकडले. पथकाने चारचाकी व दारू असा सुमारे पाच लाख १७ हजार रूपयांचा माल जप्त केला आहे.
शेजारच्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत आहे. जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव येथूनही दारू या दोन्ही जिल्ह्यात जात आहे. यावर पोलीस, रेल्वे व राज्य उत्पादन शुक्ल विभागाकडून कित्येक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यातच चारचाकी वाहनातून देशी दारूची तस्करी केली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने अर्जुनी-मोरगाव- गडचिरोली मार्गावर नाकाबंदी केली.
यामध्ये चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी दारू आढळून आली. पथकाने ५४० देशी दारू व चारचाकी असा पाच लाख १७ हजार रूपयांचा माल जप्त केला आहे. तसेच दोन जणांवर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून अर्जुनी-मोरगाव पोलिसांच्या सुपूर्द केले.

Web Title: The four-wheeler carrying liquor was caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.