Festival of women's art qualities | महिलांच्या कलागुणांचे दर्शन घडविणारा महोत्सव
महिलांच्या कलागुणांचे दर्शन घडविणारा महोत्सव

ठळक मुद्देवर्षा पटेल : कुंभारेनगर महोत्सवाचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: पहिल्यांदाच एका वॉर्डतील महिला, पुरूष, युवक व युवतींनी एकत्रीत होवून कुंभारेनगर महोत्सव आयोजित करून गोंदियाकरांना नवा संदेश दिला आहे. ज्या महिला आधी चूल आणि मूल यापुरत्याच मर्यादित राहत होत्या त्या आता महोत्सवाचे आयोजन करीत आहेत. कुंभारेनगर महोत्सव या वॉर्डातील महिलांच्या सुप्त कलागुणांचे दर्शन घडविणारा असल्याचे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी केले.
प्रज्ञाशिल बहुुउद्देशिय सामाजिक संस्था व नवोदित नवचैतन्य साहित्य कलामंचच्यावतीने आयोजित कुंभारेनगर महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगरसेवक पंकज यादव होते. प्रमुख पाहुणे म्हणून बसपाचे जिल्हाध्यक्ष धु्रवास भोयर, सामाजिक कार्यकर्ता सविता बेदरकर, नगरसेवक संकल्प खोब्रागडे, साहित्यीक यशवंत तागडे व अन्य उपस्थित होते. पूढे बोलताना पटेल यांनी, कुंभारेनगर महोत्सव हा नवनिर्मिती व परंपरेचा सुरेख संगम व नवा आविष्कार आहे. हा केवळ श्रवणानंद देणारा सोहळा नव्हे तर आत्मिक आनंद देणारी मेजवानी होय. ही कुंभारेनगर महोत्सवाची परंपरा नेहमीच सुरू राहीली पाहिजे. या महोत्सवासाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. कारण या महोत्सवातून महिलांच्या अंगातील सुप्त गुण समोर आल्याचे पाहायला मिळाले असे मत व्यक्त केले.
तसेच, सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिला. तेव्हा आमच्या या महामानवांच्या विचारांना घेवून समोर जायचे असून महिलांनी समोर येवून नवक्र ांती करून देशातील समाजविघातक प्रवृत्तींना बाहेर फेकायचे आहे असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक मांडून संचालन उदय चक्र धर यांनी केले. आभार तुषार मेश्राम यांनी मानले.
कार्यक्र मासाठी विनय सांगोडे, प्रणय दरवडे, अनिवेश तागडे, उत्तमा गोंडाणे, निर्मला मेश्राम, वैशाली चंद्रिकापूरे, सुप्रिया नागदेवे, सयोगीता मेश्राम, सपना मेश्राम, रंजिता इंदूरकर, शोभा वैद्य, लता पाटील, रितू राहुलकर, चंद्रलेखा गजभिये, आकाश बन्सोड, नवनीत भाष्कर, विशेष डोंगरे, प्रेमरतन गडपायले, दुर्गेश येल्ले, प्रमोद भोयर यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे निमित्त साधून वृक्षारोपण
कुंभारेनगर महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी वृक्षारोपणाचा कार्यक्र म घेण्यात आला. वृक्षारोपण कार्यक्र माचे उद्घाटन नगरसेवक संकल्प खोब्रागडे यांनी केले. याप्रसंगी तिर्थराज नागदेवे,यशवंत तागडे,पतीराम मेश्राम,श्रीराम कुथेकर, कृष्णाजी सांगोडे,अशोक मेश्राम,विजय मेश्राम, मनोहर दरवडे हे उपस्थित होते.


Web Title: Festival of women's art qualities
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.