शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:59 PM2019-05-24T23:59:05+5:302019-05-25T00:00:40+5:30

रब्बीची धान खरेदी आतापर्यंत सुरु झाली नसल्याने मागील १० दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांचे धान गिरणीच्या परिसरात पडून आहे. अशात अचानक मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना धान खराब होण्याची चिंता वाटत असून त्यांचे धान लवकर काटा करुन खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Farmers' rains fall in the open | शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून

शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून

googlenewsNext
ठळक मुद्देलवकर काटा करण्यासाठी विनवणी : पुरवठा अधिकाऱ्याला दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : रब्बीची धान खरेदी आतापर्यंत सुरु झाली नसल्याने मागील १० दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांचे धान गिरणीच्या परिसरात पडून आहे. अशात अचानक मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना धान खराब होण्याची चिंता वाटत असून त्यांचे धान लवकर काटा करुन खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे.
मागील १० दिवसांपासून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पिकाचे धान सहकारी भात गिरणी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर घेऊन गेले. परंतु संस्थेचे अध्यक्ष बाबुलाल उपराडे यांनी शेतकऱ्यांना सांगितले की सध्या गोदामात खरीप हंगामाचे धान भरलेले असून नवीन आवक झालेले धान मोजून ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही आहे.
अशात तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुरवठा निरीक्षक रमेश कुंभरे यांची भेट घेऊन जुन्या धानाची लवकरात लवकर उचल करुन नवीन धान काटा करायला सुरुवात करावी व धान आपल्या अधीन करावे अशी मागणी केली. धानाची उचल लवकर न केल्यास नुकसान होण्याची शक्यता वर्तविली. शिष्टमंडळात शंकरलाल मडावी, यादनलाल बनोठे, लटारु नागपुरे, परसराम फुंडे यांच्यासह तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Farmers' rains fall in the open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी