दुसऱ्या दिवशीही हटविले शहरातील अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 09:54 PM2019-05-11T21:54:15+5:302019-05-11T21:55:23+5:30

शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करुन वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषदेने शुक्रवारपासून (दि.१०) संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. ही मोहीम शनिवारी दुसऱ्या दिवशीही राबविण्यात आली.

Encroachment in the city destroyed in the next day | दुसऱ्या दिवशीही हटविले शहरातील अतिक्रमण

दुसऱ्या दिवशीही हटविले शहरातील अतिक्रमण

Next
ठळक मुद्देन.प.व वाहतूक नियंत्रण विभागाची मोहीम । रस्त्यावरील साहित्य जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करुन वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषदेने शुक्रवारपासून (दि.१०) संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. ही मोहीम शनिवारी दुसऱ्या दिवशीही राबविण्यात आली. या मोहीमेदरम्यान रस्त्यावरील अतिक्रमण हटवून साहित्य जप्त करुन ते शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले.
शनिवारी सकाळी १० वाजतापासून शहर आणि रामनगर पोलिसांनी दोन वेगवेगळे पथक तयार करून अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात केली. शहर पोलीस स्टेशन अंतर्गत चांदणी चौक, गांधी प्रतिमा, गोरेलाल चौक, इंदिरा गांधी क्रीडा संकुल परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. तर रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत रेल्वे स्टेशन समोरील, रेलटोली, शक्ती चौक व पाल चौकातील अतिक्रमण हटवून वाहतुकीसाठी रस्ते मोकळे करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक संजय सिंह यांच्या नेतृत्त्वात ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे.
यासाठी शहर आणि रामनगर पोलीस स्टेशनच्या दहा दहा पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे. तसेच नगर परिषद बांधकाम, अग्निशमन आणि नियोजन विभागाचे कर्मचारी सुध्दा या अभियानात सहभागी झाले आहेत.
शुक्रवारी शहर पोलिसांनी भादंवीच्या कलम १२२ अंतर्गत ८ व रामनगर पोलिसांनी १४ व्यापाºयांवर कारवाई केली. तर ३५ ते ४० हजार रुपयांचा माल जप्त केला. तर शनिवारी सुध्दा काही व्यापाºयांवर कारवाई करुन साहित्य जप्त केले. ही अतिक्रमण हटाव मोहीम सोमवारपासून अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या कर्मचाºयांनी दिली.
मोहीम केवळ नाममात्र ठरु नये
जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी उशीरा का होईना शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आणि शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. मात्र ही मोहीम काही काळासाठी मर्यादित राहू नये तर त्यात सातत्याने ठेवण्याची मागणी शहरवासीेयांनाकडून केली जात आहे.
छोट्यांवर कारवाई तर मोठ्यांना सूट
वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषदेने शहरात संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात केली आहे. मात्र या मोहीमेदरम्यान केवळ छोट्या व्यापाºयांना लक्ष केले जात असून मोठ्यांना सूट दिली जात असल्याने मोहीमेत दुजाभाव होत असल्याची ओरड आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेवून पारदर्शकपणे मोहीम राबविण्याची गरज आहे.

Web Title: Encroachment in the city destroyed in the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.