शेतकºयाला स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 12:15 AM2017-10-21T00:15:09+5:302017-10-21T00:15:46+5:30

राज्य शासनाने देशातील आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे. शेतकºयांना हिताच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे.

Efforts to make the farmers independent | शेतकºयाला स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्नशील

शेतकºयाला स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्नशील

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : शेतकरी कर्जमाफी प्रमाणपत्र वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य शासनाने देशातील आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे. शेतकºयांना हिताच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे. या योजनेमुळे पात्र शेतकºयांचे दीड लाख रु पये पर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. एकीकडे शेतकरी हा कर्जमुक्त होत असताना आता तो शेतीवर पूर्णपणे स्वावलंबी कसा होईल, या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले.
बुधवारी (दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ अंतर्गत पात्र शेतकºयांना कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण कार्यक्र मात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव उपस्थित होते. बडोले म्हणाले, राज्यातील ९० लाख शेतकºयांचा सातबारा या योजनेमुळे कोरा होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील ८२ हजार २२६ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहे.
१५ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकºयांच्या खात्यात पैसा जमा होणार आहे. राज्यात झालेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील शेतकºयांना मिळत नव्हता. अशी ओरड होती, परंतू या योजनेमुळे पात्र शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांना तुलनेत आपल्याकडील शेतकरी कमी प्रमाणात कर्ज घेत असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी काळे म्हणाले, पात्र शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा आरटीजीएसद्वारे जमा होणार आहे. जिल्ह्यातील दीड लाख शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरले. यावेळी बडोले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या माणिकलाल लिल्हारे, निलेश धुर्वे, चिंतामन बिसेन, मंगरु रहांगडाले, अंजनाबाई बिसेन, लखनलाल कटरे, केसरबाई चुटे, पुर्णाबाई मानकर, मंगला ऊके, जाईबाई बोरकुटे, गिताबाई कुमरे, भैय्यालाल बिसेन, नकुल नेताम, मोहन नेताम, कौशल्या कुंभरे, हिवराज राऊत, समला कुमरे, सायजा उईके, सुगंधा मडावी, सुखदेव कोरे, सिताराम शेवता, उमाबाई सलामे या शेतकºयांचा शाल, श्रीफळ व मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असलेले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे कर्जमाफीचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्र माच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षक आटे, सहायक निबंधक सर्वश्री अनिल गोस्वामी, प्रमोद हुमने, नानासाहेब कदम, भानारकर, सहायक सहकार अधिकारी बोरकर उपस्थित होते.

Web Title: Efforts to make the farmers independent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.