२० दिवसांपासून रूग्णवाहिका नादुरूस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 09:48 PM2018-09-19T21:48:28+5:302018-09-19T21:48:42+5:30

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना त्वरीत आरोग्याची सुविधा मिळावी, अपघातग्रस्त व गर्भवती महिला यांना वेळेवर उपचार मिळावा. यासाठी शासनाने १०८ क्रमांकावर रूग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे एक रूग्णवाहिका मागील २० दिवसांपासून नादुरुस्त असल्याने गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयासमोर धूळखात पडली आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.

Due to the absence of an ambulance from 20 days | २० दिवसांपासून रूग्णवाहिका नादुरूस्त

२० दिवसांपासून रूग्णवाहिका नादुरूस्त

Next
ठळक मुद्देसेवा कागदावर : ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना त्वरीत आरोग्याची सुविधा मिळावी, अपघातग्रस्त व गर्भवती महिला यांना वेळेवर उपचार मिळावा. यासाठी शासनाने १०८ क्रमांकावर रूग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे एक रूग्णवाहिका मागील २० दिवसांपासून नादुरुस्त असल्याने गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयासमोर धूळखात पडली आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.
रूग्णवाहिकेची दुरु स्ती व देखरेख करण्याकरीता कंपनीने सुपरवायझर व अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापकाची नियुक्ती केली आहे. रूग्णवाहिकेत तांत्रीक बिघाड झाल्यास संबधीत अधिकाऱ्यांना रीतसर अहवाल द्यावा लागतो. रूग्णवाहिका दुरूस्त होईपर्यंत तिची सेवा बंद करण्यात येते. येथील पर्यवेक्षक, सहाय्यक जिल्हा व्यवस्थापक यांनी संबंधित अधिकाºयांना रूग्णवाहिका नादुरूस्त असल्याची माहिती दिली नाही. केटीएस रूग्णालयातील ०४७० या क्रमांकाची रुग्णवाहिका गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयासमोर मागील २० दिवसांपासून नादुरूस्त अवस्थेत पडून आहे.
या रुग्णवाहिकेची माहिती घेण्यासाठी पुणे येथील १०८ क्रमांकावर कॉल केला असता रूग्णाची माहिती, स्थळ व नाव विचारुन केटीएसची रूग्णवाहिका पाठवितो असे सांगितले. त्यानंतर १५ मिनिटांनी बाई गंगाबाई रुग्णालयातील रूग्णवाहिका चालकाचा भ्रमणध्वनीवर फोन आला. त्यांनी केटीएसची रुग्णवाहिका बंद असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे केटीएसची रूग्णवाहिका मागील २० दिवसांपासून नादुरूस्त असताना ती कागदावर मात्र सुरू असल्याचे दाखविले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान या सर्व प्रकाराची मधुकर पटले यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.

Web Title: Due to the absence of an ambulance from 20 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.